Take a fresh look at your lifestyle.

हे आहेत DRDO चे ‘2-डीजी’ औषध बनवणारे त्रिमूर्ती; वाचा ‘त्या’ संशोधकांबद्दल माहिती

दिल्ली : डीआरडीओ या संरक्षण विभागाच्या संशोधन संस्थेने 2-डीजी (2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज) नावाचे औषध तयार केले आहे. त्याला मंजूरी मिळाल्याने करोनाला झटका देणारे हे औषध कधी एकदा हातात येते असे डॉक्टर आणि नागरिकांना झालेले आहे.  कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेने ग्रस्त असताना आणि आरोग्याच्या पायाभूत सुविधांवर प्रचंड दबाव असताना ही दिलासादायक बातमी आल्याने अनेकांच्या त्याकडे मोठ्या अपेक्षा आहेत. आहे. हे औषध तयार करण्यामागे तीन वैज्ञानिकांचे डोके आहे. डॉ. सुधीर चंदना, डॉ. अनंत नारायण भट्ट आणि डॉ. अनिल मिश्रा हे ते संशोधक आहेत.

Advertisement

हिसार येथील रहिवासी असलेले डॉ. सुधीर चंदना हे डीआरडीओमध्ये अतिरिक्त संचालक असून या औषधाच्या तयारीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. चंदना यांचा जन्म ऑक्टोबर 1967 मध्ये हिसारजवळील रामपुरा येथे झाला होता. त्यांचे वडील हरियाणा न्यायिक सेवेत नोकरीस होते. चंडीगडच्या डीएव्ही कॉलेजमधून बीएस्सी आणि हरियाणा कृषी विद्यापीठातून मायक्रोबायोलॉजीमध्ये त्यांनी एमएस्सी केले आहे. 1991 ते 1993 या काळात त्यांनी ग्वाल्हेर आणि त्यानंतर दिल्ली येथील न्यूक्लियर मेडिसिन अंड अलाइड सायन्सेस संस्थेत काम केले होते.

Advertisement

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील रहिवासी असलेले डॉ. अनंत नारायण भट्ट हे डीआरडीओच्या अणु चिकित्सा व संबद्ध विज्ञानातील वरिष्ठ वैज्ञानिक आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण जन्मगाव गगहा येथे झाले. किसन पीजी महाविद्यालयातून त्यांनी बीएस्सी केले. त्यानंतर त्यांनी अवध विद्यापीठातून बायोकेमिस्ट्रीमध्ये एमएस्सी केले. त्यांनी सीडीआरआय लखनऊ येथून ड्रग डेव्हलपमेंट यामधील पीएचडी पूर्ण केली आहे. त्यानंतर ते डीआरडीओमध्ये वैज्ञानिक म्हणून रुजू झाले.

Advertisement

मूळचे उत्तरप्रदेशातील बलिया जिल्ह्यातील रहिवासी असलेले डॉ. अनिल मिश्रा हे कॅलिफोर्निया विद्यापीठाचे पदव्युत्तर पदवीधर आहेत. त्यांनी गोरखपूर विद्यापीठातून एमएस्सी केली आणि बनारस हिंदू विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली. ते डीआरडीओच्या न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्सेसमधील वैज्ञानिक आहेत आणि सायक्लोट्रॉन आणि रेडिओ फार्मास्युटिकल सायन्स विभागात कार्यरत आहेत. 2002-2003 मध्ये ते जर्मनीतील प्रतिष्ठित मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूटमध्ये भेट देणारे प्राध्यापकही होते.

Advertisement

हैदराबादच्या डॉ. रेड्डी लॅबोरेटरीज यांच्या संयुक्त विद्यमाने डीआरडीओच्या प्रतिष्ठित प्रयोगशाळेत न्यूक्लियर मेडिसिन & अलाइड सायन्सेस (आयएनएमएएस) हे औषध विकसित केले आहे. यासंदर्भात जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षीच्या सुरूवातीला कोरोना साथीचा रोग सुरू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तयारी करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर डीआरडीओने या औषधावर काम सुरू केले. मध्यम आणि गंभीर लक्षणे असलेल्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी या औषधाच्या आपत्कालीन वापरास मान्यता मिळाली आहे.

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply