Take a fresh look at your lifestyle.

प्राण्यांमार्फत करोना पसरण्याची शक्यता वाटत असल्यास वाचा ही महत्वाची माहिती

मुंबई : हैदराबाद येथील प्राणी संग्रहालयातील आठ सिंह करोना व्हायरसने संक्रमित झाल्यानंतर देशात एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. करोनाचा प्रसार हा प्राण्यांमार्फत सुद्धा होऊ शकतो अशी चर्चा समाजमाध्यमावर सुरू होती. आता मात्र आरोग्य विभागाने उत्तर दिल्याने या चर्चेस पूर्णविराम मिळाला आहे.

Advertisement

निती आयोगाच्या आरोग्य विभागाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, की या विषाणूचा प्रसार प्राण्यांमार्फत होत नाही. करोना व्हायरस एका माणसाकडून दुसऱ्या माणसापर्यंत पोहोचतो. प्राण्यांमुळे माणसांना करोनाची लागण होत नाही.

Advertisement

Advertisement

‘द हिंदू’ ने हैदराबाद येथील सिंहांना करोना झाल्याचे म्हटले होते. या सिंहांची आरटी-पीसीआर टेस्ट केल्यानंतर त्यांना करोना असल्याचे दिसून आले. याआधी देशात प्राण्यांना करोना झाल्याचे आढळले नव्हते. विदेशात मात्र काही ठिकाणी पाळीव प्राण्यांना करोना झाल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र, त्याचे प्रमाण फारसे नव्हते. त्यानंतर भारतात देखील अशीच घटना घडल्याने खळबळ उडाली होती. आता प्राण्यांपासून सुद्धा करोना पसरण्याची भिती व्यक्त करण्यात येत होती. आणि ते सहाजिकही होते. कारण आजही देशात करोना वेगाने वाढत आहे. काही केल्या हा आजार थांबण्यास तयार नाही. त्यामुळे नागरिकांच्या मनात दहशत आहे. त्यातच आता अशी चर्चा सुरू होती. त्यामुळे आरोग्य विभागाने देखील यावर तत्काळ स्पष्टीकरण दिले आहे.

Advertisement

दरम्यान, देशात करोनाचा प्रकोप वाढतच चालला आहे. निर्बंध कडक केल्यानंतरही रुग्णसंख्या नियंत्रणात आलेली नाही. उलट दररोज लाखोंच्या संख्येत नवीन रुग्ण आढळत आहेत. रुग्ण दगावण्याचे प्रमाणही वाढले आहे. या संकटावर मात करण्यासाठी करोना प्रतिबंधक लसीकरणावर भर देण्यात येत आहे. तसेच ऑक्सिजन पुरवठ्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. कारण, ऑक्सिजनअभावी बऱ्याच रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply