Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाचं फक्त नाव बदला, महामारी छूमंतर होईल.. पहा कोणी केलीय भविष्यवाणी..?

मुंबई : नावात काय आहे, असं कोणीतरी म्हणालंच आहे. पण अहो नावातच सगळं असतंय की..आजकाल कोणी दोन ओळी लिहिल्या तरी नाव लावतंय..तुम्ही म्हणाल, आता हे काय नवीनच..? तर त्याचं असंय.. सध्या कोरोनाने सगळं जग हैराण झालंय.. भले भले शास्त्रज्ञ कोरोनावर रामबाण औषध शोधात आहेत. पण काही केल्या कोरोना आटोक्यात येत नाही..पण आमच्या एका पट्ठ्याने कोरोना हद्दपार करण्यासाठी एकदम रामबाण उपाय सूचवलाय.. आता तो कोणता.. तर फक्त कोरोनाचे नाव बदलायचं.. ही महामारी लगेच छूमंतर होणार, असा त्यांचा दावा आहे..

Advertisement

ट्विटरवर इम्तियाज मेहमूद नावाचे एक सदगृहस्थ आहेत. त्यांनी एक पोस्ट ट्विटरवर (Twiter) शेअर केली आहे. त्यात ते म्हणतात, की जगातील कोट्यवधी लोक कोरोनाचा सामना करीत आहेत. पण आता या आजारावर तोडगा सापडला आहे. फक्त एकच करायचं, कोरोनाच नाव बदलायचं.. म्हणजे ‘Corona’ वा ‘Covid -19’ ऐवजी COVVIYD-19 असं करायचं..लगेच ही महामारी जगातून नष्ट होईल बघा..

Advertisement

इम्तियाज मेहमूद यांची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेकांनी मेहमूद यांना ट्रोल करताना चांगलीच खिल्ली उडवली आहे. कोणी त्यांना ज्योतिषी म्हटलंय, तर कोणी असं पहिलंच का सांगितले नाही, असं विचारतेय.. एकाने तर नावाच्या स्पेल्लिंगमध्ये बदल केल्यावर मी अमेरिकेचा राष्ट्रपती होईन का, असा थेट सवाल केला आहे.

Advertisement

दरम्यान, याआधीही अनेक ज्योतिष्यानी कोरोनाबाबत भविष्य वर्तवले आहे. कोणी म्हणाले, की कोरोना पसरण्यास राहू आणि केतू हे दोन गृहच कारणीभूत आहेत. एकाने असं सांगितलं होत, की मंगल आणि गुरु हे जेव्हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतील, तेव्हाच कोरोनापासून सुटका होऊ शकेल..तर असं आहे सगळं. जिथं विज्ञान संपते, तेथून लोक चमत्कार सुरु होतो.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

 

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply