Take a fresh look at your lifestyle.

वाव.. फ़क़्त तीनच दिवसात प्रभाव दाखवते ‘हे’ औषध; फुफ्फुसांना मिळणार संजीवनी..!

मुंबई : सध्या 2-डीजी नावाचे औषध ट्रेंडमध्ये आहे. भारतीय संरक्षण विभागाच्या डीआरडीओ नावाच्या संस्थेने हे बनवले आहे. अगदी कमी किमतीत आणि सहजपणे बनवता येण्याजोगे असे हे औषध फ़क़्त तीनच दिवसात फुफ्फुसांना संजीवनी देत असल्याचे म्हटले जात आहे. या औषधाला ड्रग कंट्रोलर यांच्याकडून परवानगी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच हे औषध सगळीकडे उपलब्ध होईल असे म्हटले जात आहे. आता आपण पाहूया हे औषध कसे काम करते त्याची माहिती.

Advertisement

फेब्रुवारीपासून भारतात आलेल्या दुसर्‍या लाटेमुळे मृत्यूची संख्याही हळूहळू वाढत आहे. दरम्यान, ड्रग्स कंट्रोलर यांनी आपत्कालीन वापरासाठी संरक्षण संशोधन व विकास संघटना (डीआरडीओ) बनवलेल्या कोरोना औषधास मान्यता दिली आहे. चाचण्यांमध्ये या औषधाच्या वापरामध्ये तज्ञांना यशस्वी परिणाम आढळले आहेत. हे औषध पावडरच्या स्वरूपात एका पॅकेटमध्ये येते. पाण्यात विरघळवून ते पितात. हैदराबादच्या डॉ. रेड्डी लॅबोरेटरीच्या संयुक्त विद्यमाने डीआरडीओच्या प्रतिष्ठित प्रयोगशाळेतील न्यूक्लियर मेडिसिन अंड अलाइड सायन्सेस (आयएनएमएएस) यांनी हे औषध विकसित केले आहे.

Advertisement

संकटाच्या वेळी एक वरदान मानले जाणारे हे औषध तयार करण्यामागे तीन वैज्ञानिकांचे डोके लागलेले आहे. डॉ. सुधीर चंदना, डॉ. अनंत नारायण भट्ट आणि डॉ. अनिल मिश्रा हे आहेत ते संशोधक. त्यांनी म्हटले आहे की, 2-डीजी औषध कोरोना रुग्णांसाठी पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी आहे. संशोधनात असे आढळले की जर 2-डीजी औषध सामान्य असलेल्या रूग्णांना दिली गेली तर रुग्णाला या औषधाचा 30% अधिक फायदा होईल. या मदतीने कोरोनाचे रुग्ण दोन ते तीन दिवसांत बरे होऊ लागतात. हे औषध कोरोना विषाणूच्या हल्ल्यामुळे कमकुवत असलेल्या फुफ्फुसांना मजबूत करण्यास मदत करते. या औषधाचे उत्पादनही सुरू झाले असून ते प्रत्येक राज्यात पुरविले जाईल.

Advertisement

संपादन : रुपाली दळवी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply