Take a fresh look at your lifestyle.

‘कोविशील्ड’नंतर आता कोवॅक्सिनचेही पुण्यात उत्पादन, राज्य सरकार देणार बायोवेट कंपनीला ‘इतकी’ जागा

पुणे : राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. दुसरीकडे अजूनही लसीकरणाला म्हणावा तसा वेग आलेला नाही. लसीचा तुटवडा जाणवत आहे. पुण्यात ‘सिरम’च्या कोविशील्ड लसीचे उत्पादन केले जाते. आता कोवॅक्सीन लसही पुण्यात तयार केली जाणार आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोवॅक्सिन लसीचे उत्पादन महाराष्ट्रात वाढविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने पावले उचलली जात आहेत.

Advertisement

भारत बायोटेकची सहाय्यक कंपनी असलेल्या बायोवेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला पुण्यात कोवॅक्सिन लसीच्या उत्पादनासाठी 12 हेक्टरचा भूखंड देण्यास हायकोर्टाने परवानगी दिली आहे. राज्य सरकारने तत्काळ ही परवानगी देतानाच कंपनीला भूखंडाचा ताबा देण्याचा आदेश खंडपीठाने राज्य सरकारला दिला आहे.

Advertisement

परदेशातील ‘इंटरवेट इंडिया’ (Inter vet India) या कंपनीला पाय व तोंडाच्या विकारांवर लसनिर्मितीसाठी 1973 साली राज्य सरकारने पुण्यातील मांजरी खुर्द येथील भूखंड दिला होता. काही काळाने ‘इंटरवेट’ कंपनीने पुण्यातून आपला गाशा गुंडाळला. त्यानंतर सरकारने कर्नाटकातील ‘बायोवेट’ कंपनीला ही जागा देण्यासंदर्भात करार केला.

Advertisement

जागा हस्तांतरणाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. ही जागा वन विभागाचा दावा वन विभागाने केला होता. त्यामुळे बायोवेट कंपनीने या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर न्यायमूर्ती के. के. तातेड आणि न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

Advertisement

राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोनी यांनी युक्तिवाद केला. त्यांनी कोर्टाला सांगितले, की कंपनीला जीवरक्षक लसनिर्मितीसाठी नक्कीच परवानगी दिली जाईल; पण कंपनीने त्या जागेवर कायमस्वरूपी ताबा घेण्याचा विचार करू नये.

Advertisement

उच्च न्यायालयाने कोवॅक्सिन लसीच्या उत्पादनासाठी 12 हेक्टरचा भूखंड देण्यास परवानगी दिली. तसेच, राज्य सरकारने ही परवानगी देतानाच कंपनीला तत्काळ भूखंडाचा ताबा देण्याचा आदेश राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळे लवकरच येथे लस उत्पादन सुरु झाल्यास कोरोनाविरुद्धच्या लढाईला बळ मिळणार आहे.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
1 Comment
  1. Subrata Mukherjee says

    Informative and helpful 🙏

Leave a Reply