Take a fresh look at your lifestyle.

आणखी एक दुर्घटना : पाच मिनिटांच्या उशिराचा फटका; 11 जणांच्या जीवाला बसला झटका..!

हैदराबाद : ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू. याचे महत्व सध्या अवघ्या जगाला खऱ्या अर्थाने समजले आहे. कारण, करोना कालावधीत अनेकांची प्राणज्योत याच ऑक्सिजनच्या अभावी विझली आहे. नाशिक येथील दुर्घटना तर अवघ्या भारतामध्ये खळबळ उडवून देणारी होती. तसाच प्रकार आंध्रप्रदेश राज्यातील एका हॉस्पीटलमध्ये घडला आहे. फ़क़्त पाच मिनिटांचा उशीर झाल्याने इथे तब्बल 11 जणांचा बळी गेला आहे.

Advertisement

तिरुपती जिल्ह्यात ही दुर्घटना घडली आहे. सामाजिक कार्यकर्त्या लिसिप्रिया यांनी या दुर्दैवी घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या रुग्णालयात ऑक्सिजनचा मोठा साठा असूनही फक्त रिलोड करण्यात उशीर झाल्यामुळे ही दुर्घटना घटना घडली आहे. तिरुपतीमधील रुइया गवर्नमेंट हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला आहे. हॉस्पिटलच्या ICU वार्डात ऑक्सिजन पुरवठा बंद पडल्याने 11 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Advertisement

(1) Krushirang on Twitter: “भयंकर प्रकार आहे यार हा…” / Twitter

Advertisement

मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ऑक्सीजन आणि व्हेंटिलेटर सपोर्टवर असलेले रुग्ण दिसत आहेत. तसेच नंतरचा गोंधळही त्यात दिसत आहे. चित्तूरचे कलेक्टर एम. हरी. नारायणन यांनी सांगितले की, ऑक्सिजन सिलेंडर रिलोड करण्यात 5 मिनीटांचा उशीर झाल्याच्या कारणाने रुग्णांना श्वसनात अडचण आल्याने या घटनेत 11 रुग्णांनी जीव गमावला आहे. रुग्णालयात ICU आणि ऑक्सिजन बेडवर 700 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply