Take a fresh look at your lifestyle.

महत्वाची माहिती : पहा चिमुकल्यांचे न्यूमोनियापासून संरक्षण करण्यासाठी काय ठरतेय उपयोगी

पुणे : जगभरात करोनाची दुसरी लाट जोमात असतानाच आता तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झालेली आहे. या तिसऱ्या लाटेत मुलांना करोना संक्रमण होण्याचा जास्त धोका असू शकतो असे अनेक तज्ञांना वाटत आहे. त्यामुळे आपणही आपल्या कुटुंबातील आणि नातेवाईक यांच्याकडे असलेल्या चिमुरड्यांची काळजी घेणे आवश्यक आहे.

Advertisement

कोरोना महामारीच्या दरम्यान शास्त्रज्ञांनी एक तंत्र तयार केले आहे जे मुलांमध्ये श्वसन संसर्गापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरण्याचे चिन्ह आहे. या तंत्राने श्वसनरोग पसरविणाऱ्या मानवी पॅरेनफ्लुएंझा विषाणूपासून बचाव करण्याच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा झाली आहे. जेनेटिक टेक्नोलॉजीद्वारे मुलांमध्ये प्रोटीन किंवा पेप्टाइड याचा वापर करण्याचे हे तंत्र आहे. यामुळे पॅराइनफ्लुएंझा विषाणू पेशींना चिकटून राहण्यापासून प्रतिबंधित करणे शक्य आहे. अमेरिकन केमिकल सोसायटीच्या जर्नलमध्ये नवीन तंत्रज्ञानाबद्दल संशोधकांनी त्यांचे संशोधन निष्कर्ष प्रकाशित केले आहेत.

Advertisement

मानवी पॅरेनफ्लुएंझा व्हायरस किंवा एचपीआयव्ही हे मुलांमध्ये श्वसन संसर्गाचे मुख्य कारण आहे. म्हणूनच न्यूमोनिया आणि इतर श्वसन रोग होतात. इम्युनिटी पॉवर कमी असल्यास विषाणूची लागण तातडीने होते. मुले आणि वृद्ध व्यक्तींच्या शरीरात जाऊन एचपीआयव्ही विषाणू त्यांच्या शरीराच्या पेशींवर चिकटून राहतो आणि नवीन व्हायरस बनवण्याचे काम सुरू करतो. हे रोखण्यासाठी पेप्टाइटचे उपचार केले जातात. एचपीआयव्ही 3 हा सर्वात सक्रिय व्हायरस आहे. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या कोणतीही लस किंवा अँटीव्हायरल औषधे नाहीत.

Advertisement

विस्कॉन्सिन मॅडिसन विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील सॅम गेलमन लॅब आणि कोलंबिया विद्यापीठाच्या ऐनी मॉस्कोना व मॅटिओ पोरोटो यांच्या प्रयोगशाळेत संशोधकांनी पेप्टाइड तंत्रज्ञानाद्वारे विषाणूच्या उपचारांवर काम करण्याची प्रक्रिया बदलली आहे. हे तंत्रज्ञान एचपीआयव्ही 3 विषाणूपासून बचाव करण्यास सक्षम आहे.

Advertisement

कोरोना विषाणूदेखील रुग्णांच्या श्वसन प्रणालीवरच हल्ला करतो. कोरोनाची सुरुवातीची लक्षणे न्यूमोनियासारखीच आहेत. सर्दी-खोकला-ताप यापासून त्याची सुरू होते. तथापि काही रुग्णांमध्ये लक्षणे फारच कमी दिसतात. त्यामुळे या संशोधांच्या मदतीने करोनावर मात करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Advertisement

संपादन : रुपाली दळवी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply