Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग : म्हणून पुण्यामधील लसीकरण स्लॉट बुकिंग सुविधा बंद..!

पुणे : करोना लसीकरण केंद्रावरील आणि ऑनलाइन पद्धतीने केल्या जाणाऱ्या बुकिंगचा गोंधळ महाराष्ट्रात कायम आहे. केंद्र आणि राज्य सरकारची यंत्रणा एकमेकांना पाण्यात पाहण्याच्या नादात या बाबींकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यातच आता राज्य सरकारच्या ‘स्पष्ट सूचना’ नसल्याच्या कारणाने पुण्यातील लसीकरण स्लॉट बुकिंग सुविधा बंद झालेली आहे.

Advertisement

याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात म्हटले आहे की, आज रात्री ८ वा. स्लॉट बुकिंग सुविधा बंद असेल ! १८ ते ४४ वयोगटासाठीच्या लसीकरणासाठी आवश्यक असणारी बुकिंग आज रात्री ८ वा. उपलब्ध नसेल. लसीकरणासंदर्भात राज्य सरकारकडून निर्देश येणे बाकी असल्याने उद्याच्या लसीकरणासाठीचे बुकिंग उद्या सकाळी ८ वा. करता येईल. नोंद घ्यावी.

Advertisement

Murlidhar Mohol on Twitter: “#IMP : आज रात्री ८ वा. स्लॉट बुकिंग सुविधा बंद असेल ! १८ ते ४४ वयोगटासाठीच्या लसीकरणासाठी आवश्यक असणारी बुकिंग आज रात्री ८ वा. उपलब्ध नसेल. लसीकरणासंदर्भात राज्य सरकारकडून निर्देश येणे बाकी असल्याने उद्याच्या लसीकरणासाठीचे बुकिंग उद्या सकाळी ८ वा. करता येईल. नोंद घ्यावी.” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply