Take a fresh look at your lifestyle.

फिकर नॉट.. कारण वजन कमी होईल की झटक्यात; फ़क़्त ‘त्या’ 5 पदार्थांना द्यायचे महत्व

आजच्या धावपळीच्या जमान्यात आरोग्याकडे लक्ष देणे कठीण होत चालले आहे. फास्टफूडची सवय वाढत आहे. आहाराच्या वेळा पाळल्या जात नाहीत. शरीराला ज्या पद्धतीचा सकस आहार आवश्यक आहे, तो मिळत नाही. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. वाढलेल्या वजनाची समस्या तर बऱ्याच जणांना जाणवत आहे. वाढलेले वजन अनेक आजारांना निमंत्रण देणारे ठरत असल्याने लोक वजन कमी करण्यासाठी अनेक महागडे उपचार करतात. मात्र, प्रत्येकालाच असे खर्चिक उपचार घेणे शक्य होत नाही. पण काळजी करू नका, काही घरगुती उपायही आहेत. ज्यांच्या माध्यमातून आपण वाढलेल्या वजनावर नियंत्रण मिळवू शकतो. रोजच्या आहारात काही बदल केले तरी या समस्येवर मात करता येऊ शकेल.

Advertisement

दही खाण्यामुळे वाढलेले वजन नियंत्रित होण्यास मदत मिळते. दह्यात असे अनेक घटक आहेत. दह्याने केवळ वजनच नियंत्रित होते असे नाही तर हाडे देखील मजबूत होतात. अनेक प्रोबियोटिक्स दह्यात आढळतात.

Advertisement

लिंबू पाण्याचे देखील फायदे आहेत. रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून पाणी प्यावे, यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. तसेही उन्हाळ्यात लिंबू पाणी पिण्यास सांगितले जातेच. आता वजन कमी करण्याचा उपाय म्हणून लिंबू पाणी घेण्यास हरकत नाही. नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करण्यासाठी लिंबू फायदेशीर ठरू शकते.

Advertisement

ताकामध्ये तर अनेक गुणधर्म आहेत. उन्हाळ्यात ताक पिण्यास नेहमीच सांगितले जाते. यामुळे शरीरातील उष्णता नियंत्रित राहण्यास मदत मिळते. तसेच जास्त वजन असलेल्या मंडळींसाठी सुद्धा ताक पिणे फायदेशीर आहे. नियमितपणे ताक घेतल्यास पोटाची चरबी कमी होण्यास मदत मिळते.

Advertisement

उन्हाळ्यात टरबूजास मोठ्या प्रमाणात मागणी असते. या फळात जवळपास ९५ टक्के पाणीच असते. त्यामुळे शरीराची पाण्याची मागणी याद्वारे पूर्ण होते. टरबूजात फायबरचे प्रमाण जास्त असते. तसेच यामध्ये शून्य प्रमाणात चरबी आणि कोलेस्ट्रॉल असते, त्यामुळे टरबूज देखील वजन कमी करण्यास उपयुक्त आहे.

Advertisement

भोपळा भारतात सर्वत्र उपलब्ध होतो. उन्हाळ्याच्या दिवसात भोपळा खाल्ल्याने वजन कमी होते. भोपळ्यात मुबलक प्रमाणात कॅलरीज आणि जीवनसत्वे असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी देखील भोपळा उपयुक्त आहे.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply