Take a fresh look at your lifestyle.

आईची आठवण आल्यावर युनिव्हर्स बॉसही रडला; पहा ‘तो’ व्हायरल व्हिडिओ

दिल्ली : जगातील सर्वात आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जाणारा ख्रिस गेल नेहमी मैदानावर आणि मैदानाबाहेर मजा, एैश करताना दिसतो. चौकार आणि षटकारांसह त्याच्या स्वभावासाठी तो जगभरात ओळखला जातो. सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ शेअर करत असतानाही तो इतर खेळाडूंचे पाय खेचत राहतो. पण युनिव्हर्स बॉस म्हणून प्रसिद्ध असलेल्या ख्रिस गेलने नुकतीच सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर केली आहे ज्यामध्ये तो रडताना दिसत आहे.

Advertisement

मदर्स डेच्या दिवशी ख्रिस गेलने एक स्टोरी शेअर केली. यामध्ये तो आपल्या आईची आठवण करुन भावनिक होतो आणि रडू लागतो. मदर्स डेच्या निमित्ताने सर्व खेळाडू आणि युझर्सनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून आईच्या आठवणी शेअर केल्या. त्याच वेळी, गेलने त्याच्या आईची आठवण काढली असता त्याने रडण्यास सुरवात केली.

Advertisement

(1) Infidel 2.0 on Twitter: “😥😥 https://t.co/Ufe5xrCClF” / Twitter

Advertisement

ख्रिस गेलने आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या आईला ‘मला माफ कर’ अशी आठवण करून देत लिहिले आहे की, आम्हाला जेवायला देण्यासाठी तुम्ही खूप संघर्ष केला. आपण खूप बोलू. मी तुझ्यावर कायम प्रेम करत राहीन. गेलचा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चांगलाच व्हायरल होत आहे.ख्रिस गेलच्या आईचे २०१८ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. याआधीही ख्रिस गेल आपल्या आईची आठवण काढताना भावनिक झाला आहे. ख्रिस गेल आयपीएलच्या या मोसमात पंजाब किंग्जकडून खेळताना दिसला. त्याने आयपीएलमध्ये खेळलेल्या ८ सामन्यात १७८ धावा केल्या. पण आयपीएलला कोरोना विषाणूमुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे.
संपादन : अपेक्षा दाणी.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply