Take a fresh look at your lifestyle.

‘वर्क फ्रॉम होम’मुळे होतोय ‘हा’ गंभीर आजार, काय काळजी घ्याल..?

मुंबई : कोरोनामुळे बहुतेक जण सध्या ‘वर्क फ्रॉम होम’ (Work From Home) करत आहेत. ‘वर्क फ्रॉम होम’मुळे अनेकांना तासनतास एकाच जागेवर बसून काम करावं लागत. एकाच जागेवर तासनतास बसल्याने मान, पाठ, कंबर आणि स्नायू दुखण्यास सुरुवात होते. असं असेल, तर आजच काही सवयींमध्ये बदल करा, अन्यथा खूप वेळ एकाच जागी बसल्याने ‘डिप व्हेन थ्रोम्बोसिस’चा (DVT) विकार जडण्याची शक्यता असते. हा एक गंभीर आजार असून, यामुळे माणसाचा मृत्यूदेखील होऊ शकतो.

Advertisement

पायामध्ये दोन प्रकारच्या शिरा किंवा नसा (Veins) असतात. वरच्या पृष्ठभागातील शिर आणि खोल भागातील शिरेचा यात समावेश असतो. खोल भागातील शिरा फुफ्फुस आणि हृदयाकडे दूषित रक्त घेऊन जातात. जेणेकरून तिथून शुद्ध रक्ताचा पुरवठा शरीराच्या इतर भागांना होऊन तुम्हाला ऊर्जा मिळते. ‘डिव्हीटी’ आजारात खोल भागातील शिरांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. त्यामुळे दूषित रक्त हृदय किंवा फुफ्फुसापर्यंत पोहोचू शकत नाही. ते पायातच साठून राहतं. यामुळे पायाला सूज येऊन वेदना सुरू होतात.

Advertisement

‘डिव्हीटी’च्या 10 टक्के रुग्णांच्या नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होऊन, त्या फुफ्फुसात अडकण्याचा धोका असतो. याला ‘पल्मनरी एम्बोजिल्म’ असंही म्हणतात. यामुळे फुफ्फुसांना ऑक्सिजन पुरवठा होत नाही. परिणामी, रुग्णाचा मृत्यूदेखील होऊ शकतो. ‘डिव्हीटी’ हा आजार वृद्ध व्यक्तींमध्ये अधिक प्रमाणात दिसतो. अनेकदा आनुवंशिक कारणांमुळे देखील हा आजार संभवतो. अनेकदा या आजाराचा परिणाम पायांबरोबर हातांवरही होतो.

Advertisement

‘डिव्हीटी’ची लक्षणं

Advertisement
 • कमरेखाली संपूर्ण पायावर सूज येणं आणि वेदना होणं.
 • पायांमध्ये बधीरपणा जाणवणं.

कशामुळे होतो?

Advertisement
 • एकाच जागेवर जास्तवेळ बसून राहणं
 • 2 ते 3 तास शस्त्रक्रिया केल्याने.
 • सर्व प्रकारचे कर्करोग
 • प्रोटीन किंवा सी एन्जामाईनची कमतरता
 • आनुवंशिक कारणे

  कसा कराल बचाव?
 • रोज अर्धा तास फिरणं आवश्यक आहे. यामुळे रक्ताभिसरण चांगलं राहतं.
 • ‘वर्क फ्रॉम होम’ करताना थोड्या-थोड्या वेळाने चालावं.
 • जास्त काळ विमानप्रवास करत असाल, तर दर 2 तासांनी शरीर रिलॅक्स करा.
 • वजन जास्त असणाऱ्यांनी ‘विंडो सीट’वर बसणं टाळावं.
 • एकाच जागेवर जास्त काळ बसू नये. दिवसभरात थोडा वेळ चालावं.
 • वजन नियंत्रित ठेवावं, धूम्रपान करू नये.
 • भरपूर पाणी पिण्यास द्यावं.

संपादन : सोनाली पवार

Advertisement
 • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
 • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply