Take a fresh look at your lifestyle.

सनरायझर्स हैदराबाद संघाने कोरोना संकटात दिली ‘इतक्या’ कोटींची मदत

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) टीम सनरायझर्स हैदराबादचे मालक सन टीव्हीने सोमवारी राज्य आणि केंद्र सरकार यांच्यासह स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने राबविल्या जाणाऱ्या कोविड मदत कार्यांसाठी ३० कोटी रुपयांची देणगी दिली आहे.  कोविड साथीच्या आजाराच्या दुसऱ्या लाटेने भारतात थैमान घातले असून देशात दिवसभरात ४ लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद केली जात आहे. तर ४ हजारांहून अधिक नागरिक मृत्यूमुखी पडत आहेत.

Advertisement

सनरायझर्स हैदराबादने म्हटले आहे की, कोविड साथीच्या दुसऱ्या लाटेमुळे पीडित लोकांना दिलासा देण्यासाठी सन टीव्ही ३० कोटी रुपयांची देणगी देत आहे. हे पैसे भारत सरकार आणि राज्य सरकारच्या कार्यक्रमांमध्ये तसेच धर्मदाय संस्था आणि स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने ऑक्सिजन सिलिंडर, औषधे इत्यादी प्रदान करण्याच्या विविध अभियानांमध्ये वापरले जातील.

Advertisement

दरम्यान, सनरायझर्ज हैदराबाद संघ कोरोनाच्या या भीषण संकटकाळात मदतीसाठी धावल्याने संघाच्या असंख्य चाहत्यांनी कौतुक करत आपल्या संघाबाबत अभिमान वाटत असल्याचे म्हटले आहे. यंदाची आयपीएल स्पर्धा स्थगित झाली असून यावर्षी हैदराबाद संघाला आपल्या लौकिकास अभिप्रेत असलेली कामगिरी करता आली नाही, त्यामुळे संघाचे चाहते प्रचंड नाराज होते. मात्र हैदराबाद संघाने कोरोना मदतकार्यासाठी पाऊल उचलल्याने चाहत्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply