Take a fresh look at your lifestyle.

तर, श्रीलंका दौऱ्यावर रोहित-विराटच्या अनुपस्थितीत यापैकी एक करणार टीम इंडियाचे नेतृत्व..!

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी जाहीर केले की टीम इंडिया जुलै महिन्यात एकदिवसीय आणि टी २० मालिका खेळण्यासाठी श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाईल. या दौऱ्यावर हा संघ तीन एकदिवसीय मालिका आणि पाच टी २० सामन्यांची मालिका खेळणार आहे. गांगुली म्हणाले की, या दौऱ्यावर जाणाऱ्या संघात विराट कोहली, रोहित शर्मा यासारख्या स्टार खेळाडूंचा समावेश नाही, कारण दोन्ही खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी तयारी करणार आहेत. दोन्ही खेळाडूंच्या अनुपस्थितीत संघाचा कार्यभार कोण सांभाळणार, हा प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न आहे. अशा परिस्थितीत कोणाला संघाचा कर्णधार बनवले जाऊ शकतो, अशा खेळाडूंची माहिती घेवू या.

Advertisement

शिखर धवन :
या दौऱ्यावर सलामीवीर शिखर धवनचे नाव कर्णधार पदाच्या शर्यतीत अव्वल आहे. २०१८ मध्ये एशिया कप दरम्यान धवनला संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तथापि, मागील ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर रोहित शर्माच्या अनुपस्थितीत मर्यादित षटकांच्या मालिकेत धवनला तितकेसे प्राधान्य मिळाले नाही. संघातील अनुभवी खेळाडूंपैकी एक असलेल्या धवनची बॅट यंदाच्या आयपीएलमध्ये चांगलीच चमकली. ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी तहकूब होण्यापूर्वी त्याने आठ सामन्यांमध्ये सुमारे ५५ च्या सरासरीने सर्वाधिक ३८० धावा केल्या. यावेळी धवनने सहकारी फलंदाज पृथ्वी शॉ याच्यासह संघाला दमदार सुरुवात करुन देत सामना जिंकण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

Advertisement

केएल राहुल :
गेल्या आयपीएल मोसमात आपल्या फलंदाजीने सर्वांना वेड लावणारा पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुल यालाही श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी कर्णधार म्हणून नेमले जाऊ शकते. शेवटच्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर रोहित शर्माच्या अनुपस्थितीत, केएल राहुलला मर्यादित षटकांच्या मालिकेचा उप-कर्णधार म्हणून निवडले गेले. आयपीएल २०२० मध्ये ऑरेंज कॅप त्याने पटकावली होती. यंदाच्या आयपीएल हंगामातही राहुलच्या बॅटने बॅटने जोरदार कामगिरी केली आहे. त्याने स्पर्धा पुढे ढकलण्यापूर्वी ७ सामन्यात ६७ च्या सरासरीने ३३१ धावा केल्या.

Advertisement

भुवनेश्वर कुमार:
इंग्लंड दौऱ्यासाठी २० सदस्यीय संघात निवड न झालेल्या महत्त्वाच्या खेळाडूंमध्ये भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा समावेश आहे. अनेक दिग्गज खेळाडूंनी बीसीसीआयला भुवनेश्वरला संघात न घेतल्याबद्दलही प्रश्न उपस्थित केले आहेत. आयपीएलमध्ये केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत भुवनेश्वरने सनरायझर्स हैदराबादकडून काही सामन्यांचे नेतृत्वही केले आहे. भुवनेश्वरने आतापर्यंत मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये १६४ बळी घेतले आहेत.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply