Take a fresh look at your lifestyle.

सोन्याच्या दरात तेजी, चांदीही वधारली; मात्र उच्चांकी पातळीपेक्षा कमीच!

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भांडवली बाजारावर चांगलाच परिणाम झाल्याचे दिसत आहेत. सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. ‘मल्टी कमोडिटी एक्सचेंज’वर आज सोन्याच्या भावात वाढ दिसून आली.

Advertisement

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमतीत सुधारणा झाल्याचे दिसत आहे. भारतात आज सोन्याचा जूनचा वायदा 58.00 रुपयांच्या तेजीसह 47,809.00 रुपये पातळीवर होता, तर चांदीचा जुलैचा वायदा 720.00 रुपयांच्या तेजीसह 72,149.00 रुपयांवर व्यापार करत होता. सोन्याचा दर वाढला असला, तरी तो आपल्या सर्वोच्च स्तराच्या 9,015 रुपयांनी कमीच आहे.

Advertisement

दिल्लीत आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 50 हजार रुपये प्रति तोळा होता. चेन्नईमध्ये 49220 रुपये, कोलकाता 49670, तर मुंबईमध्ये 45920 रुपये प्रति 10 ग्रॅम सोन्याला भाव मिळाला.

Advertisement

ऑगस्ट-2020च्या पहिल्या आठवड्यात सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकावर राहिला होता. 7 ऑगस्ट 2020 रोजी सोन्याचे भाव 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमवर गेले होते. त्यानंतर भावात मोठी घसरण झाली. 7 मे 2021 रोजी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे बाजार 47,760 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. त्यामुळे आजही सोन्याचे दर ऑगस्ट-2020मधील उच्चांकापेक्षा 9,015 रुपये प्रति 10 ग्रॅमने कमीच आहेत.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply