Take a fresh look at your lifestyle.

महत्वाची आठवण : पंतने आजच्याच दिवशी केली होती ‘ती’ विक्रमी शानदार खेळी

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (१० मे) दिल्ली कॅपिटलसाठी खेळत असताना पंतने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध १२८ धावांची खेळी करत आपल्या नावावर मोठा विक्रम नोंदविला होता. आयपीएल २०२१ मध्ये श्रेयस अय्यर जखमी झाल्यानंतर पंतला कर्णधार म्हणून नेमण्यात आले. कोरोना प्रकरण उघडकीस आल्यानंतर सध्या आयपीएलला स्थगिती देण्यात आली आहे.

Advertisement

पंतने १० मे २०१८ रोजी दिल्ली फिरोजशाह कोटला मैदानावर (आता अरुण जेटली स्टेडियम) ५६ चेंडूत शतक झळकावले होते आणि आयपीएलमध्ये असे करणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला होता. त्याने २० वर्ष २१८ दिवसांत हा पराक्रम केला. सर्वात कमी वयात म्हणजेच वयाच्या १९ व्या वर्षी मनीष पांडेने शतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे. पांडेने २००९ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना १९ वर्षे आणि २५३ दिवसात शतक झळकावले.

Advertisement

पंतने आपल्या खेळीदरम्यान ६४ चेंडू खेळत १२८ धावा केल्या, यामध्ये १५ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. पंतची ही खेळी आयपीएलच्या इतिहासातील पाचवी सर्वात मोठी खेळी आहे, तर आयपीएलमधील सर्वात मोठी खेळी करणारा तो दुसरा भारतीय खेळाडू आहे. इतकेच नव्हे तर त्यावेळी त्याने आयपीएलमध्ये आपल्या १ हजार धावाही पूर्ण केल्या होत्या.

Advertisement

हे आहेत आयपीएलमध्ये शतक ठोकणारे युवा खेळाडू :

Advertisement
  1. मनीष पांडे : १९ वर्षे आणि २५३ दिवस.
  2. ऋषभ पंत : २० वर्ष आणि २१८ दिवस.
  3. देवदत्त पडिककल : २० वर्षे आणि २८९ दिवस.
  4. संजू सॅमसन : २२ वर्षे आणि १५१ दिवस.
  5. क्विं टन डी कॉक : २३ वर्षे आणि १२२ दिवस.

संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply