Take a fresh look at your lifestyle.

म्हणून DRDO च्या औषधाला म्हटले जाते फुफ्फुसांची संजीवनी; वाचा त्याबद्दल महत्वाची माहिती

मुंबई : सध्या देशभरात करोना रुग्णांचा आकडा काहीअंशी कमी झालेला आहे. मात्र, त्याला योग्य औषधोपचार किंवा लसीकरण असे कारण नाही. तर, लॉकडाऊन लागू झाल्याने असे काहीअंशी का होईना सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, त्याचवेळी अवघ्या देशाचे लक्ष आता DRDO च्या 2-डीजी या औषधाकडे लागलेले आहे.

Advertisement

Krushirang on Twitter: “IMP Information; Must See…” / Twitter

Advertisement

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) यांनी देशात तयार केलेल्या कोविडविरोधी या औषधाच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे. कोरोना विषाणूची मध्यम ते गंभीर लक्षणे असलेल्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी हे औषधे एक उपयुक्त पद्धत म्हणून वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या साथीच्या दुसर्‍या लाटेने भारत गंभीर परिस्थितीत असताना आणि देशाच्या आरोग्याच्या पायाभूत सुविधांवर खूप दबाव असताना हे औषध मंजूर झाल्याने अनेकांना यातून आशेचा किरण दिसत आहे. मात्र, याची व्यापक परिणामकारता स्पष्ट झाल्यावरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

Advertisement

Krushirang on Twitter: “याकडेही लक्ष द्या रे.. #मराठी #बातम्या #महाराष्ट्र #भारत #LatestNews #Maharashtra #MarathiNews #News #India #trending #health #CoronavirusIndia #Corona2ndWave #COVIDEmergency2021 #OxygenCylinder https://t.co/sJtbYXMI3u” / Twitter

Advertisement

डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) यांनी हैदराबादच्या डॉ. रेड्डी लॅबोरेटरीच्या सहकार्याने हे औषध बनवलेले आहे. या औषधाचे नाव 2-डीजी आहे. त्याचे पूर्ण नाव 2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज आहे. सामान्य रेणू आणि ग्लूकोजच्या अनुरुपतेमुळे हे सहजपणे तयार होते. देशात मोठ्या प्रमाणात उपलब्ध केले जाऊ शकते. 2-डीजी हे औषध पावडरच्या स्वरूपात पॅकेटमध्ये येते. ते पाण्यात विरघळून पितात. याची विक्री किंमत किती असेल याबाबतही चर्चा चालू आहेत. याबद्दल अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, असे म्हटले जात आहे की एका पॅकेटची किंमत 500 ते 600 रुपयांपर्यंत असू शकते. डॉ. रेड्डीज यांच्यातर्फे यांचे उत्पादन आणि वितरण केले जाणार आहे.

Advertisement

हे औषध ज्या रुग्णांना श्वासोच्छवास घेण्यामध्ये समस्या आहेत त्यांच्यासाठी महत्वाचे ठरणार आहे. क्लिनिकल चाचण्यांमधून असे दिसून आले आहे की, 2-डीजी औषध रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांच्या ऑक्सिजनची अवलंबित्व कमी करते. संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, कोविड 19 च्या दुसर्‍या लाटेत रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना मोठ्या संख्येने ऑक्सिजनची आवश्यकता पडत आहे. हे औषध असे अनमोल जीव वाचविण्याची मदत करण्याची अपेक्षा आहे. कारण हे औषध संक्रमित पेशींवर काम करते. त्यामुळे रुग्णालयात दाखल असलेल्यांचा कालावधीही कमी होतो.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

Krushirang on Twitter: “#करोनासम्राट #करोनागुरू https://t.co/yB2SI1vGmi” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply