Take a fresh look at your lifestyle.

काळजी घ्या रे : महाराष्ट्रातही करोनाच्या जोडीला ब्लॅक फंगस; वाचा लक्षणे आणि घातक परिणाम

औरंगाबाद : करोनातून बरे झालेल्या रुग्णांना सध्या ब्लॅक फंगस (म्युकरमायकोसिस / काळी बुरशी) होऊन त्यांचा जीव धोक्यात येण्याच्या प्रकरणात वाढ होत आहे. गुजरात आणि मुंबईनंतर आता थेट मराठवाडा भागातही याचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे. अंबेजोगाई, माजलगाव, बीड आणि हिंगोली येथे असे रुग्ण सापडल्याची नोंद झाली आहे.

Advertisement

म्युकरमायकोसिस हा आजार दुर्मिळ समजला जातो. मात्र, आता त्यांच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. करोनातून बरे झालेल्या अनेकांना हा आजार झाल्याचे स्पष्ट होत आहे. करोना झाल्यावर ज्या रुग्णांना इंजेक्शन टॉसिलीझुमॅब, रेमडेसिविर इंजेक्शन दिले आहे किंवा पाच दिवसांपेक्षा जास्त ऑक्सिजन दिला अशा सर्वांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Advertisement
अशी आहेत लक्षणे आणि घ्या ही काळजी
दात : हिरड्या दुखणे, दात दुखणे, हिरड्यांमधून रक्त येणे, पू येणे
डोळे : डोळे जळजळ करणे, डोळे लाल होणे, डोळे दुखणे
याचा संसर्ग ताेंड, डोळे, जबडा यातून पुढे मंेदूपर्यंत जातो
काही रुग्णांमध्ये डोळ्यांच्या खोबणीतून डोळा बाहेरही येतो
डोळा गमावण्याची शक्यता अधिक असते
नाकातून किंवा तोंडातून या बुरशीचा संसर्ग होतो
लक्षणे दिसताच डोळ्यांचे डॉक्टर किंवा कान, नाक व घसा तज्ज्ञ यांच्याकडे जावे

 

Advertisement

(1) Krushirang on Twitter: “योगी राज्यातील वास्तव आहे असे… #मराठी #बातम्या #महाराष्ट्र #भारत #LatestNews #Maharashtra #MarathiNews #News #India #trending #health #CoronavirusIndia #Corona2ndWave #COVIDEmergency2021 #OxygenCylinder #mumbai #PoliticsOnVaccine #UttarPradesh #yogiji https://t.co/02OnioajbK” / Twitter

Advertisement
काळजी घेण्याचे महत्वाचे मुद्दे
तोंडात काळे चट्टे आल्यानंतर तातडीने दंतचिकित्सक यांचा सल्ला घ्यावा
ग्णांमधील प्रतिकारशक्ती कमी होत असल्याने या आजाराचा संसर्ग झपाट्याने होत आहे
टॉसिलीझुमॅब, रेमडेसिविर इंजेक्शन दिले आहे किंवा पाच दिवसांपेक्षा जास्त ऑक्सिजन दिला अशा सर्वांवर लक्ष ठेवा
 कोरोनाची लागण झाल्यानंतर तिसऱ्या व चौथ्या आठवड्यामध्ये नाक नॉर्मल सलाइनने स्वच्छ करा
रक्तातील साखरेचे प्रमाण १५ व्या व २२ व्या दिवशी तपासून घ्या
नाकामध्ये बुरशीची लागण झाली आहे की नाही हे पाहण्याकरिता नाकातील स्वॅब पंधराव्या व बाविसाव्या दिवशी तपासा

 

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply