Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. हे तर भयंकरच; योगीराज्याची कमाल, आमदारही झालेत ‘अशा पद्धती’ने बेहाल..!

दिल्ली : उत्तरप्रदेश राज्यात राम मंदिर उभारताना रामराज्य नाही तर रामभरोसे राज्य आल्याचे विदारक चित्र आहे. इथे भले कागदोपत्री रुग्णसंख्या मकी दिसत असेल. मात्र, वास्तव वेगळे आणि भयंकर आहे. इथे सर्दी-तापेच्या गोळ्या-औषधांचा काळाबाजार जोरात असतानाच हॉस्पिटलमध्ये बेड मिळणे ही दुर्मिळ गोष्ट बनली आहे. अगदी आमदारांनाही इथे बेडसाठी वणवण करावी लागत आहे.

Advertisement

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याच भाजपच्या आमदाराने आग्रा येथील एसएन मेडिकल कॉलेजवर योग्य उपचार न मिळाल्याचा आरोप केला आहे. फिरोजाबाद जिल्ह्यातील जसराना येथील आमदार राम गोपाल उर्फ ​​पप्पू लोधी यांचे म्हणणे आहे की, त्यांची पत्नी कोविडमुळे संक्रमित आहे आणि त्यांना येथे उपचारासाठी रेफर करण्यात आले होते. परंतु, पत्नीला बराच काळ अंथरुण न मिळाल्याने त्यांना 3 तास जमिनीवर ठेवण्यात आले. पत्नीच्या प्रकृतीची माहिती सांगितली जात नाही. योग्य अन्न दिले जात नाही. अगदी वेळेवर पाणीही दिले जात नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.

Advertisement

वैद्यकीय अधिकारी व डॉक्टर काहीही करत नाहीत, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. दि. 30 एप्रिल रोजी पप्पू लोधी यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांची पत्नी संध्या लोधी यांनाही याची लागण झाली. सुरुवातीला त्यांना फिरोजाबादच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तब्येत बिघडल्यामुळे शनिवारी त्यांना वॉर्डमधून एसआर मेडिकल कॉलेज, आग्रा येथे रेफर करण्यात आले. मात्र, योग्य उपचार तर नाहीच परंतु योग्य सेवा मिळण्यातही त्यांच्या पत्नीला अडचणी येत आहेत.

Advertisement

पप्पू लोधी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची पत्नी 3 तास जमिनीवर पडून राहिली. अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून त्यांना बेड पुरविण्यात आला. मात्र, अजूनही प्रकृती कशी आहे, ते सांगितले जात नाही. एसएन मेडिकल कॉलेज आग्रामध्ये उपचार चांगले होत नाहीत. तर, एकूणच उत्तरप्रदेशच्या आरोग्य विभागाची ही गंभीर स्थिती आहे. आमदारांच्या पत्नीला उपचाराची प्रतीक्षा करावी लागत असल्यास सामान्य जनतेच्या परिस्थितीचा अंदाज लावलाच नको, असे चित्र आहे.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply