Take a fresh look at your lifestyle.

थोरातांचे संगमनेर बनलेय करोना हॉटस्पॉट; पहा किती आहे आजची रुग्णसंख्या

अहमदनगर : महापालिका क्षेत्रात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे नगर शहरातील करोना रुग्णसंख्या कमी होण्यास सुरुवात झालेली आहे. त्याचवेळी उत्तर नगर जिल्ह्यातील आरोग्य सेवेमध्ये असलेल्या अडचणी वाढत असतानाच या भागातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या तालुकानिहाय रुग्णसंख्येत संगमनेर तालुक्याने बाजी मारली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे एकहाती वर्चस्व असलेल्या या तालुक्यात आज सर्वाधिक म्हणजे 594 इतकी रुग्णसंख्या वाढ झाली आहे.

Advertisement

अहमदनगर महापालिका क्षेत्रात लॉकडाऊन लागू केल्याने आता कुठे रुग्णसंख्येचा आकडा कमी होण्यास सुरुवात झाली होती. दरम्यान, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र कुठेलेही निर्बंध नसल्याचा गैरफायदा घेऊन अनेकजण मोकाट फिरत आहेत. परिणामी ग्रामीण भागाचे करोना मीटर वेगाने पुढे जात आहे. त्यातच आता नगर शहरात आणखी एकदा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला जाणार अआहे. त्यामुळे भविष्यात नगर शहरातील आकडा आणखी कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. थोरातांच्या संगमनेरनंतर या दुर्दैवी यादीत नगर तालुक्याने बाजी मारली आहे. तर, भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा राहता तालुका तिसऱ्या स्थानावर आहे.

Advertisement

तालुकानिहाय आकडेवारी अशी (दि. 10 मे 2021) :

Advertisement
तालुका / भाग आजची रुग्णवाढ
संगमनेर 594
नगर ग्रामीण 377
राहता 317
नेवासा 311
शेवगाव 306
नगर महापालिका 284
पाथर्डी 272
अकोले 260
पारनेर 220
श्रीरामपूर 205
श्रीगोंदा 197
राहुरी 196
कर्जत 157
कोपरगाव 154
जामखेड 111
इतर जिल्ह्यातील 65
भिंगार 22
मिलिटरी हॉस्पिटल 11
एकूण 4059

 

Advertisement

संपादन : संतोष शिंदे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply