Take a fresh look at your lifestyle.

अहमदनगरमध्ये झालाय ‘हा’ महत्वाचा निर्णय; पहा कसा होणार याचा सर्वांनाच फायदा

अहमदनगर : महापालिका आणि जिल्ह्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या लक्षात घेता प्रशासन आणि नागरिकांनी आणखी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्याचवेळी करोना रुग्णांना उपचार मिळण्यात येणाऱ्या अडचणी, औषधांचा काळाबाजार आणि लसीकरण केंद्रांवरील गर्दीमुळे संक्रमणाची वाढलेली भीती याबाबत नगर तालुका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्यांनी लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

त्यातील पहिला टप्पा म्हणून आता नगर तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांवर करोनाची आरटीपीसीआर चाचणी करण्यास सुरुवात होत आहे. तसेच आता गावोगावी लसीकरण करण्याचाही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. लसीकरण केंद्रांवर लांबच लांब रांगा, त्यात वयोवृद्धांचे होणारे हाल, सामाजिक अंतर पाळले न जाणे, लसीचा तुटवडा असले चित्र लक्षात घेऊन नगर तालुक्यात गाव तेथे लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे.

Advertisement

तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण ९ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. सध्या आरोग्य केंद्रनिहाय लसीकरण सुरू होते. मात्र, एका केंद्रात १० ते १२ गावांचा समावेश असल्याने लसीकरणासाठी एवढ्या गावातील लोकांची एकाचवेळी गर्दी होत असते. लसींचा मर्यादित पुरवठा व लसीकरणासाठी होणारी मोठी गर्दी यामुळे लसीकरणाचे नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे तालुक्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

Advertisement

जिल्हा परिषद सदस्य सदस्य संदेश कार्ले यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, गोविंद मोकाटे, बाळासाहेब हराळ, सभापती सुरेखा गुंड, उपसभापती डॉ. दिलीप पवार व इतर पदाधिकाऱ्यांनी गावनिहाय लसीकरण सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला. प्रशासनाने त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आत या तालुक्यात गावोगावी लसीकरण शिबीर घेऊन नागरिकांची गर्दी आणि त्यामुळे होणारे संक्रमण टाळणे शक्य होणार आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply