Take a fresh look at your lifestyle.

शेतकरी व नगरकरांसाठी महत्वाची बातमी : पहा आणखी ‘इतके’ दिवस राहणार आहे अशीच परिस्थिती

अहमदनगर : करोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी आता महापालिका कार्यक्षेत्रातील लॉकडाऊन आणखी वाढवण्यात आलेला आहे. त्यामुळे किराणा आणि भाजीपाला या जीवनावश्यक वस्तू मिळणेही नगरमध्ये दुरापास्त होणार आहे. दि. १५ मे रोजी सकाळी सातपर्यंत औषध दुकाने व दूध वगळता इतर सर्वच अत्यावश्यक सेवेतील इतर दुकानेही बंद ठेवण्याचा आदेश महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी दिलेले आहेत.

Advertisement

भाजीपाला पुरवठ्यासंबंधी याहीवेळी शेतकरी आणि ग्राहकांचा विचार करण्यात आलेला नसल्याने आता पुढील पाच दिवसात घरात शिजवायचे काय, असाही प्रश्न आता अनेकांना पडला आहे. दरम्यान, लोकांना भाजीपाला उपलब्ध करून देण्याच्या मागणीवर महापालिका प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. कृषी विभागाचे आत्मा गट किंवा महापालिकेच्या देखरेखेखाली भाजीपाला उपलब्ध करून देण्याच्या मागणीकडे प्रशासनाने अजिबात लक्ष दिलेले नाही. त्याचवेळी नगरमध्ये ज्या पद्धतीने दुध थेट घर्पोहीच दिले जाते त्याचा धर्तीवर भाजीपाला आणि किराणा देण्याची सोय करून असा लॉकडाऊन आणखी काही कालावधीसाठी ठेवण्याची मागणीही होत आहे.

Advertisement

कडक निर्बंध लागू असताना सर्वच दुकाने बंद असूनही शहरातील वर्दळ कमी होऊ शकलेली नाही. पोलीस कोणतीही कारवाई करीत नाहीत, तसेच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मोकाट हिंडत असल्याने गर्दीला आणखी वाट मिळत आहे. काही ठिकाणी नागरिकांना चोरून-लपून भाजीपाला घ्यावा लागला आहे. अशावेळी नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन आणि शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन भाजीपाला विक्रीसाठी धोरण जाहीर करण्याची मागणी किसान सभेचे भैरवनाथ वाकळे यांनी केली आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply