Take a fresh look at your lifestyle.

पंधराच मिनिटात बनवा की मलई-गुलाबजामून; वाचा आणि ट्राय करा ही भन्नाट रेसिपी

गुलाबजामून.. असे नाव ऐकले किंवा समोर पाहिले तरी तोंडाला पाणी न सुटणारा महाभाग विरळा. किमान एक का होईना पण गुलाबजामून खायलाच पाहिजे, असे तरी मग वाटून जातेच की. आपण कधीही विचार केला आहे का, की मिठाईच्या दुकानांमध्ये ताज्या गुलाब जामुनचे ढीग नेहमी सर्वात पुढे का दिसतात? कारण त्यांची चव घेतल्याशिवाय पुढे जाने अशक्य आहे की. तर, निःसंशयपणे सर्वात लोकप्रिय भारतीय मिठाईंपैकी एक असलेला गुलाबजामून वेगळ्या पद्धतीने बनवण्याची पाककृती आज आपण पाहणार आहोत.

Advertisement

फक्त मूठभर ब्रेडचे तुकडे घेऊनही आपण झकास असे गुलाबजामुन बनवू शकतो की. आज आपण त्याचीच रेसिपी शिकणार आहोत. त्यासाठीची कृती आणि लागणारे उपपदार्थ यांची माहिती अशी :

Advertisement
 1. अगोदर आपण यासाठी पाक बनवून घेऊया की. तर पाक बनवण्यासाठी कढईत साखर, आणि पाणी एकत्रितपणे मध्यम आचेवर उकळवा. किंचित चिकट होईस्तोवर हे ढवळत राहा.
 2. यात चवीनुसार वेलचीची पूड आणि केशर घाला. बनवलेला पाक हा मधासारखा असावा. त्यात सराखेचे खडे राहणार नाही याची काळजी घ्या. बनवून झाल्यावर झाकण बंद करा आणि बाजूला ठेवा.
 3. आता ब्रेडचे काही तुकडे घ्या. पांढरा भाग वापरा. भाजलेल्या आणि लालसर झालेल्या कडा कापून घ्या. त्याचे तुकडे लहान तुकडे करा.
 4. मग या ब्रेडच्या तुकड्यांवर गरम दूध टाकून हळूहळू मिसळा. त्यावेळी ब्रेड पिळू नका. याद्वारे हलक्या हाताने मऊ पीठ तयार करा.
 5. मलई बनवण्यासाठी भांड्यांसाठी किसलेले नारळ घ्या. त्यात थोडी पिठी साखर (साखरही चालते), दुधाची पावडर, मलई, दूध आणि वेलची पावडर घालून हे मिश्रण चांगले तापवून मग बाजूला ठेवा.
 6. आता ब्रेडचे पीठ मळून घ्या. त्यात तूप घालून हळूहळू हे मळून घ्या.
 7. याचे लहान-लहान गोळे बनवा. दरम्यान हे चिरणार नाहीत याची काळजी घ्या.
 8. हे गोळे जास्त तळण्याची गरज नाही. मध्यम आचेवर तळून घ्या.
 9. मग गरम पाकमध्ये हे गुलाब जामुन मिसळा आणि फक्त 10 मिनिटे भिजत ठेवा.
 10. ते थेडे थंड झाल्यावर गुलाब जामुन अर्ध्या भागामध्ये हलक्या हाताने कापून घ्या. त्यात क्रीम स्टफिंग करून घ्या. मध्ये ही मलई घातल्यावर पिस्ता घालून सजवा.

अरे झाले की तुमचे मलई-गुलाबजामुन तयार. मस्तपैकी याला सर्व्ह करा. करोना कालावधीत सध्या ही एक भत्ता रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि जीवनातील गोडी ‘गुलाबजामून’मय करा की.. कसे झालेय गुलाबजामून त्याची प्रतिक्रिया नक्कीच द्या.

Advertisement

संपादन : रुपाली दळवी

Advertisement

जब जीतना हो परिवार का दिल तो झटसे बिना मावा सोडा ऐसे Malai Gulab Jamun जिसका हर सामन घर में जाए मिल – YouTube

Advertisement
 • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
 • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply