Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ अहवालामुळे जगभरात खळबळ; पहा नेमका काय आहे चीनचा भयंकर डाव..?

दिल्ली : कोविड महामारीच्या पाच वर्षांपूर्वी चीनमधील शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूचा उपयोग शस्त्रे म्हणून केला होता. तसेच तिसऱ्या महायुद्धामध्ये जैविक शस्त्रांचा अंदाजही त्यात वर्तविल्याबद्दलचा अंदाज अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाकडून प्राप्त झालेल्या कागदपत्रांतून स्पष्ट होत आहे. याचा हवाला देत जगभरातील मीडिया रिपोर्टमध्ये वेगवेगळे आणि धक्कादायक दावे केले गेले आहेत.

Advertisement

ब्रिटनच्या ‘द सन’ या वृत्तपत्राने ‘द ऑस्ट्रेलियन’चा अहवालाचा हवाला देत असे म्हटले आहे की, अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने दिलेली “स्फोटक” कागदपत्रे असे दर्शवितात की चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) यांचा कमांडर या जीवघेण्या विषयावर भविष्यवाणी करीत होता. कोविड 19 च्या उत्पत्तीचा शोध घेत असलेल्या अमेरिकन शास्त्रज्ञांनी कागदपत्रे संकलित केली आहे. ज्यात चिनी लष्कर व आरोग्य अधिकाऱ्यांनी 2015 मध्येच कागदपत्रांमध्ये अशा विषाणूच्या वापराबद्दल म्हटलेले होते.

Advertisement

चिनी वैज्ञानिकांनी सार्स कोरोना विषाणूचा उल्लेख “जैविक शस्त्रास्त्राचे नवीन युग” म्हणून केला होता. त्याचे एक उदाहरण म्हणजे कोविड 19 आहे. पीएलएच्या कागदपत्रांवरून असे दिसून आले आहे की, जैविक शस्त्र हल्ला शत्रूची वैद्यकीय यंत्रणा नष्ट करू शकेल. कागदपत्रांमध्ये यूएस एअरफोर्सचे कर्नल मायकेल जे यांच्याबद्दल देखील उल्लेख आहे. त्यांना भीती होती की, जैविक शस्त्राद्वारे तिसरे महायुद्ध होऊ शकते.

Advertisement

अहवालात असेही म्हटले आहे की, 2003 मध्ये पसरलेला एसएआरएस (सार्स) हे मानवनिर्मित जैविक शस्त्र असू शकतो. जो दहशतवाद्यांनी मुद्दाम पसरविला होता. खासदार टॉम टॅगेन्ट आणि ऑस्ट्रेलियन राजकारणी जेम्स पॅटरसन यावर म्हणाले आहे की, कोविड 19 च्या उत्पत्तीविषयी आणि चीनच्या अपारदर्शकतेबद्दल सुरू असलेल्या खेळत या कागदपत्रांमुळे आणखी चिंता वाढली आहे. तथापि, बीजिंगमधील ग्लोबल टाईम्स या अधिकृत मुखपत्राने चीनच्या प्रतिमेस डागाळण्यासाठी हा लेख प्रकाशित केल्याबद्दल ‘द ऑस्ट्रेलियन’वर टीका केली आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply