Take a fresh look at your lifestyle.

तर अहमदनगरमध्ये वाढणार कडक लॉकडाऊन; पहा नेमका काय निर्णय होऊ शकतो ते

अहमदनगर : शहरातील वाढत्या रुग्णासंख्येला आटोक्यात आणण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनचे काहीअंशी सकारात्मक रिझल्ट दिसत आहेत. त्यामुळे आणखी प्रभावी पद्धतीने लॉकडाऊन लागू करण्याच्या कालावधीत वाढ करण्याची तयारी महापालिका प्रजासानाने केली आहे. मात्र, त्याची अधिकृत घोषणा सायंकाळी होण्याची शक्यता आहे.

Advertisement

याबाबत ज्येष्ठ पत्रकार विजयसिंह होलम यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या लॉकडाऊन वाढवण्याची मागणी सर्वच बाजूने होत आहे. त्यामुळे करोनाची साखळी तोडण्याच्या उपायाचा भाग म्हणून आणखी किमान 5-7 दिवसांचा लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो. मात्र, सात दिवसांमध्ये अनेकांचा किरणा संपेल अशी शक्यता लक्षात घेऊन आणखी किमान 5 दिवसांचा लॉकडाऊन वाढू शकतो. सध्या प्रशासन लोकप्रतिनिधी आणि आरोग्य क्षेत्रातील जाणकारांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेणार आहे.

Advertisement

होलम यांनी म्हटले आहे की, ‘नगर शहरात लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधाची मुदत १५ मेपर्यंत वाढणार. आज मध्यरात्री आधीच्या आदेशाची मुदत संपत होती. महापौर बाबासाहेब वाकळे, आयुक्त शंकर गोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत कडक लॉकडाउन वाढविण्याचा निर्णय.’ मात्र, याची अधिकृतरीत्या घोषणा झाल्याशिवाय कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये.

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement

Vijaysinh Holam on Twitter: “अहमदनगर : नगर शहरात लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधाची मुदत १५ मेपर्यंत वाढणार. आज मध्यरात्री आधीच्या आदेशाची मुदत संपत होती. महापौर बाबासाहेब वाकळे, आयुक्त शंकर गोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत कडक लॉकडाउन वाढविण्याचा निर्णय” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply