Take a fresh look at your lifestyle.

गडकरींनी दिला महत्वाचा मूलमंत्र; भाजप कार्यकर्त्यांनाही दिल्यात जोरदार कानपिचक्या

मुंबई : सध्या मदत कमी आणि मोठे आकडे फेकून आणि बातम्यांमध्ये झळकून आपणच महान असल्याचे भासवण्याचा प्रयत्न सर्वपक्षीय कार्यकर्ते करीत आहेत. आमदार-खासदार यांच्यासह नव्याने राजकारात येऊ इच्छिणाऱ्या मंडळींनी असल्या प्रकारांना उत आणला आहे. त्याचवेळी सरकारी आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजलेले असताना असे जबाबदार लोकप्रतिनिधी मुग गिळून गप्प आहेत. अशा सर्वांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नवा मूलमंत्र दिला आहे.

Advertisement

माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम सध्या राज्यभरात विनामास्क दौरे करीत आहे. सगळीकडे उद्घाटन करण्याच्या कार्यक्रमात गर्दी करण्याला भाजप कार्यकर्त्यांनी उत आणला आहे. तसेच महाविकास आघाडीचे आमदारही यात अजिबात मागे नाहीत. परिणामी सरकारी यंत्रणा यातच गुरफटली आहे. आरोग्य यंत्रणेच्या याच मुद्द्यासह राजकीय कार्यकर्त्यांनी नेमके काय करावे, याचा मूलमंत्र नितीन गडकरी यांनी दिला आहे. एकूणच यानिमित्ताने त्यांच्या भाजप पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांनाही या कानपिचक्या असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Advertisement

गडकरी म्हणाले आहेत की, सेवा कार्य करताना तब्येतीची काळजी घ्या. गाफील राहू नका. रोज सकाळी एक तास प्राणायाम करा. पहिले आरोग्य, नंतर परिवार आणि त्यानंतर पक्ष हे सूत्र लक्षात घ्या. आपल्या घरची आर्थिक घडी नीट ठेवा. एकाच उपकरणासोबत चार जण छायाचित्रे काढून पाठवून मदत केल्याचे दाखवत फिरू नका. मदत कार्य माहिती व्हावे इतपत मर्यादित प्रसिद्धी केली तर हरकत नाही. पण, त्याचा बागुलबुवा उभा करणे चांगले नाही. सगळ्याच गोष्टीमध्ये फलक आणि झेंडे लावणे गरजेचे नाही. मदतीचेही राजकारण केले तर लोकांना मनातून ते आवडत नाही.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply