Take a fresh look at your lifestyle.

निवडणुकीत दारू नाही तर वाटावी लागली ‘ही’ औषधे; पहा नेमके काय आहे उत्तरप्रदेशचे वास्तव

लखनौ : महाराष्ट्रासह देशभरात करोना रुग्णांची आकडेवारी आणि या आजारामुळे वाढलेला मुत्युचा आकडा अनेकांची धडकी भरवणारा आहे. अशावेळी उत्तरप्रदेश या सर्वाधिक मोठ्या राज्यातील कमी रुग्णसंख्या अनेकांना राजकीयदृष्ट्या सुखद वाटणारी आहे. मात्र, वास्तवात याच्या उलट चित्र असून करोना चाचण्या न होणे आणि सर्दी-खोकला-ताप यांचे रुग्ण व मृतांची नोंद करोनात न करणे हे या ‘यशा’चे गमक असल्याचे दिसते. राष्ट्रीय माध्यम समूह ‘दैनिक भास्कर’ने यावर खऱ्या अर्थाने प्रकाशझोत टाकला आहे.

Advertisement

येथे नुकत्याच पंचायत निवडणुका झाल्या. आता त्यांच्या पदाधिकाऱ्यांची निवड होणार आहे. मात्र, निवडणुकीत सामान्य मतदारांना यंदा दारू नाही तर सर्दी-ताप-खोकला यांची औषधे वाटण्याला प्राधान्यक्रम मिळाला होता. त्याच जीवावर अनेकांनी निवडणुकीत बाजी मारली आहे. या भागात 10 रुपयांचे पॅरासिटामोल सध्या 200 रुपयांना विकत घेण्याची वेळ रुग्णांवर आलेली आहे. ललितपूर जिल्ह्यातील पीरघाट, बालाबेहट, बरोदिया, बमनोरा, कपूरिया, सलैया, दुधई, शहपुरा, गिरेनी, बजरंगगड, ऐरावनी, बछलापुरा आणि बिरघा गावातील हे विदारक वास्तव आहे. ग्राउंड रिपोर्टमधील मुद्दे असे :

Advertisement
  1. ललितपूरचे डीएम ए. दिनेश कुमार सांगतात, ओपीडी बंद असल्याने लोक त्रस्त आहेत. याबाबत सरकारला सतत माहिती देत आहोत.झाशीहून चाचणी अहवाल खूप उशिरा येतो.
  2. येथील ग्रामस्थ सांगतात की, ६० किमी लांब ललितपूरला करोना चाचणी होते. काहीजण गेले होते, गर्दी पाहून परत आले. लॉकडाऊनमुळे बस बंद असल्याने जाणेही शक्य नाही.
  3. अनेकजण सांगतात की, मलेरिया आणि टायफॉइडचा एका माणसातून दुसऱ्या माणसात संक्रमण होऊन लोक मरत आहेत. असे या भागात पहिल्यांदाच घडत आहे.
  4. ललितपूरमध्ये औषधाच्या दुकानांवरून लपून औषध घ्यावे लागत आहे. औषधांचा तुटवडा आहे. एकाच गावात महिन्यात 50 जण मृत पावले आहेत. वर्षभरातही इतके मृत्यू पाहिले नव्हते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
  5. गेल्या काही दिवसांत जेवढे लोक मेले सर्वांना ताप-खोकला होता. याची साधिया औषधेही मिळत नाहीत.

स्त्रोत : दैनिक भास्कर

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply