Take a fresh look at your lifestyle.

मोदींचे ‘ते’ निर्णय आणि कार्य भारताला भोवले; पहा नेमके काय म्हटलेय ‘लान्सेट’ने

मुंबई : कोणतेही चांगले झाले की ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कमाल आणि काहीही अयशस्वी किंवा चूक झाले की त्याची जबाबदारी सिस्टीम, यंत्रणा आणि भारतीय नागरिकांची. असेच चित्र सध्या देशभर रंगवले जात आहे. त्यालाच चपराक देताना जगप्रसिद्ध ‘लान्सेट’ या सायन्स जर्नलने केंद्र सरकारला फटकारले आहे. संपादकीयमध्ये त्यांनी देशाच्या आरोग्य धोरणाचा खरपूस समाचार घेतला आहे.

Advertisement

जगभरात पहिल्या लाटेत भारताने चांगले काम करून कारोनाची रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यात यश मिळवले. मात्र, त्यावेळी इतर देशांमधील चित्र दाखवून मोदीजी कसे विश्वगुरु आणि वॅक्सिंनगुरू आहेत यावर फोकस करीत केंद्र सरकारच्या जबाबदारी मंत्री आणि प्रतिनिधींनी श्रेय लाटण्याच्या नादात नव्या संकटाकडे दुर्लक्ष केले. परिणामी दुसरी लाट वेगाने फोफावली आणि जगभरात भारताने अनेक अर्थाने नकारात्मक बाबींमध्ये पहिला क्रमांक पटकावला. त्यावरही ‘लान्सेट’ने नेमके बोट ठेवले आहे. त्यांच्या लेखामधील मुद्दे असे :

Advertisement
 1. कोरोनाच्या सुपर स्प्रेडरमुळे होणारे नुकसान माहित असतानाही कुंभमेळा आणि निवडणुकीच्या प्रचार सभा घेतल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ
 2. मोदींनी आपल्या चुकांची जबाबदारी घेऊन तातडीने कार्यवाही करून तिसऱ्या लाटेपूर्वी देशातील आरोग्य यंत्रणा सुधारावी
 3. मोदी सरकार कोरोना महामारीला नियंत्रित करण्याऐवजी ट्विटरवर होत असलेल्या टीकांना रोखण्यात गुंतले
 4. सरकारने राज्यांसोबत चर्चा केल्याशिवाय अचानक लसीकरण सुरू केले आणि यामुळे 2% पेक्षा कमी लोकांचेच लसीकरण होऊ शकले
 5. मेडिकल ऑक्सीजन, बेड, वेंटिलेटर आणि औषधांची मागणी करणाऱ्या सोशल मिडिया पोस्ट लक्षात घेता केंद्र सरकार आरोग्याची ही परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहे
 6. आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन मार्चच्या आधीच महामारी संपली असल्याची घोषणा करून त्याचे श्रेय मोदींना देताना दुसरी लाट येणार असल्याची माहिती असूनही दुर्लक्ष केले
 7. मोदी सरकारने आता पुन्हा पारदर्शकपणे काम करायला हवे
 8. लसीकरण कार्यक्रम चांगल्या पद्धतीने आखून वेगाने पुढे न्यायला हवा
 9. मोदी सरकारने जनतेला योग्य आकडेवारी द्यावी
 10. दि. 1 ऑगस्टपर्यंत कोरोनामुळे दहा लाख रुग्णांचा मृत्यू झाल्यास, मोदी सरकार यासाठी सर्वस्वी जबाबदार असेल

संपादन : संतोष वाघ

Advertisement
 • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
 • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply