Take a fresh look at your lifestyle.

मुकेश अंबानींच्या ‘रिलायन्स’च्या शिरपेचात मानाचा तुरा, पहा काय विक्रम केलाय या कंपनीने.!

नवी दिल्ली : मागील काही वर्षात मुकेश अंबानी यांच्या ‘रिलायन्स रिटेल’ने झपाट्याने विस्तार केला. रिलायन्स समूहाने विस्ताराच्या मोठ्या योजना आखल्या आहेत. ‘रिलायन्स जिओ’च्या माध्यमातून मुकेश अंबानी यांनी दूरसंचार क्षेत्रात पाय रोवले आहेत.

Advertisement

रिलायन्स जिओ देशातील आघाडीची दूरसंचार कंपनी बनली आहे. ‘फेसबुक’ (Facebook)ने ‘जिओ’मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. आगामी काळात रिलायन्स समूह मोठा विस्तार करणार आहे. विशेषत: डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत ‘रिलायन्स’ मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे.

Advertisement

मुकेश अंबानी यांच्या ‘रिलायन्स रिटेल’मध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. जगातील सर्वात ताकदवान २५० रिटेल कंपन्यांच्या यादीत स्थान मिळवणारी ही एकमेव भारतीय कंपनी ठरली आहे. ‘रिलायन्स रिटेल’ (Reliance Retail) जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या रिटेल कंपन्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Advertisement

‘डेलॉईट’कडून (Deloitte) ‘ग्लोबल रिटेल पॉवर हाऊस- २०२१’ची यादी जाहीर करण्यात आली. मागील वर्षी याच यादीमध्ये रिलायन्स रिटेल पहिल्या क्रमांकावर होती. ‘डेलॉईट’च्या ‘ग्लोबल पॉवर्स ऑफ रिटेलिंग’च्या यादीत (Global Powers of Retailing) रिलायन्स रिटेल ५३व्या क्रमांकावर आहे. मागील वर्षी रिलायन्स रिटेल ५६ व्या क्रमांकावर होती.

Advertisement

या यादीमध्ये वॉलमार्ट (Walmart) पहिल्या क्रमांकावर अबाधित आहे, तर ‘अॅमेझॉन’ (Amazon) दुसऱ्या क्रमांकावर आहे. ‘कॉस्टको होलसेल कॉर्पोरेशन’ तिसऱ्या क्रमांकावर, जर्मनीचा ‘श्वार्झ समूह’ चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये टॉप-१० मध्ये सात रिटेल कंपन्या अमेरिकन आहेत. यात एक ब्रिटिश कंपनी, टेस्को पीएलसी १०व्या क्रमांकावर आहे.

Advertisement

रिलायन्स रिटेल एकमेव भारतीय कंपनी
जगातील सर्वात बलाढ्य २५० रिटेल कंपन्यांच्या यादीत ‘रिलायन्स रिटेल’ ही एकमेव भारतीय कंपनी ठरली आहे. ‘ग्लोबल पॉवर्स ऑफ रिटेलिंग’ आणि ‘वर्ल्ड्स फास्टेस्ट रिटेलर्स’च्या यादीत ‘रिलायन्स रिटेल’चे नाव सलग चौथ्या वेळेस आले आहे.

Advertisement

‘डेलाईट’च्या अहवालात म्हटले आहे, की ‘रिलायन्स रिटेल’ वेगाने वाढणाऱ्या ५० कंपन्यांमध्ये मागील वर्षी पहिल्या क्रमांकावर होती, तर यावर्षी दुसऱ्या क्रमांकावर आहे. कंपनीने प्रत्येक वर्षी ४१.८ टक्के वाढ नोंदवली आहे. कंपनीचे एकूण स्टोअर ११,७८४ वर पोचले आहेत.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply