Take a fresh look at your lifestyle.

अरे बापरे.. इथे तर थेट पॅरासिटामोलचाही काळाबाजार; 10 रुपयांची स्ट्रीप ‘इतक्या’ रुपयांना..!

लखनौ : सध्या उत्तर भारतीय पट्ट्यातील राज्यांमध्ये खूप कमी रुग्णसंख्या आहे. पह हे फ़क़्त कागदोपत्री वास्तव असून, प्रत्यक्षात त्या ठिकाणी भरमसाठ रुग्णसंख्या आहे. चेकिंग आणि ट्रेसिंग या नियमांना हरताळ फासून येथील सरकारी आरोग्य यंत्रणा रामभरोसे चालू आहे. अगदी रेमडेसिविर औषधांची नाही तर पॅरासिटामोलसारख्या सध्या औषधांचाही काळाबाजार त्या ठिकाणी जोमात आहे.

Advertisement

याबाबत दैनिक भास्कर समूहाने स्पेशल ग्राउंड रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. त्यात म्हटले आहे की, शहपुर नावाच्या गावातील सुमारे ५०० लोकसंख्येपैकी ४०० जण सर्दी, पडशे, ताप आणि खोकला यामुळे आजारी आहेत. अनेकजण तापीचे औषध नेऊन आपले आजार बरे करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मेडिकलमध्येच जाऊन औषधे आणली जाता आहेत. गरिबी असल्याने या भागातील अनेकांना मोठे दवाखाने माहित नाहीत. त्यामुळे मग गावोगावच्या डिग्री असलेल्या किंवा नसलेल्या डॉक्टरांच्या जीवावर येथे उपचार चालू आहेत.

Advertisement

मध्यप्रदेश राज्याच्या सीमेलगत असलेल्या उत्तरप्रदेश राज्याच्या ललितपूर जिल्ह्यातील १३ गावांमध्ये अशी विदारक परिस्थिती आहे. इथे अगदी पॅरासिटामोलचाही काळाबाजार जोमात आहे. १० रुपयांचे पॅरासिटामोल २०० रुपयांत घेण्याची वेळ येथील रुग्णांवर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आलेली आहे. एकूणच मुख्यंमत्री योगी आदित्यनाथ यांच्या राज्यातील आरोग्य व्यवस्था आणि एकूणच करभार आता खऱ्या अर्थाने रामभरोसे चालू आहे. पत्रकार प्रमोद कुमार यांनी हा धक्कादायक आणि भयंकर असा ग्राउंड रिपोर्ट प्रसिध्द केला आहे. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
1 Comment

Leave a Reply