Take a fresh look at your lifestyle.

आघाडीत पडली काडी : काँग्रेसने फुंकले रणशिंग; दिला स्वबळाचा नारा..!

मुंबई : महाविकास आघाडीला सध्या अनेकजण तिघाडी, बिघाडी किंवा महावसुली आघाडी असे नाव ठेऊन टीका करीत आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांसह सोशल मिडीयामध्ये हे तिन्ही शब्द रुळलेले आहेत. अशावेळी आता पुढील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मोर्चेबांधणी करताना महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत हिल असेही चित्र नाही. कारण, काँग्रेस पक्षाने आताचा त्यासाठी स्वबळाचा णार दिला आहे.

Advertisement

राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक महाराष्ट्र शाखेच्या राज्यस्तरीय कार्यकारिणीच्या ऑनलाइन बैठकीत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाचे मनसुबे जगजाहीर केले आहेत. आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्धार व्यक्त करताना त्यासाठी तयारीला लागण्याचे स्पष्ट निर्देश पटोले यांनी दिल्याने आता राष्ट्रवादी आणि शिवसेना हे घटकपक्ष कोणती भूमिका घेणार याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्र सरकार मात्र शेतकरी, कामगारांच्या विरोधात कायदे करत आहे. त्याला पक्षाने जोरदार वोरोध करायला पाहिजे. कार्यकत्यांनी त्यासाठी सक्रीय राहावे. काँग्रेस हा पक्ष नसून विचारधारा आहे. त्या विचारधारेला पुढे नेण्यासाठी आणि पुन्हा एकदा अवघ्या भारत देशामध्ये तळागाळातील घटकापर्यंत नेण्याची जबाबदारी म्हणून काम करायला हवे. कामगार कायदे मोडीत काढीत मालकधार्जिणे कायदे बनवून कामगार देशोधडीला लावण्याचे काम मोदी सरकार  करीत असल्याने इंटकने कामगारांमध्ये याबाबत आणखी जागृती करावी. केंद्राचे कामगारविरोधी कायदे महाराष्ट्र राज्यात लागू होऊ देणार नाही, असेही पटोले यांनी स्पष्ट केलेले आहे.

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply