Take a fresh look at your lifestyle.

होय, खरं आहे हे.. पुन्हा येतोय 6600 आणि 3660 ही; पहा नेमके काय असतील फीचर्स

पुणे : 2005-06 चा काळ अनुभवलेल्या मंडळींचा जीव की पार असलेला 6600 पुन्हा येतोय. होय, बाबांनो (आणि मैत्रिणींनोही) ही काही फेक न्यूज किंवा 15 लाखांची जुमालेबाजी नाही. नोकिया कंपनी पुन्हा एकदा 6600 आणि 3660 हे दोन्ही मोबाईल मॉडेल्स बाजारात घेऊन येत आहे.

Advertisement

एचएमडी ग्लोबल लवकरच आपला अतिशय खास फोन नोकिया 6600 याचा नवीन अवतार आणि भन्नाट वैशिष्ट्यांसह लॉन्च करण्याची तयारी करीत आहे. 2000-2010 च्या दशकात नोकिया 6600 ही जवळजवळ प्रत्येकाची आवड होती. हा फोन आपल्याकडे असावा म्हणून त्याकाळी तरुणाई किसी भी हद तक जाने के लिए तैय्यार थी. आताचा हा नवा त्याचा अवतारातील मोबाईल प्रॉपर स्मार्टफोनच्या रूपात असणार आहे. याबरोबरच नोकियाचा आणखी एक अतिशय स्टाइलिश म्हणून ओळखला जाणारा नोकिया 3660 हा फोनदेखील नवीन अवतारात सादर केला जाणार आहे. नोकियाच्या या फोनची बातमी सध्या ट्रेंडमध्ये आहे.

Advertisement

या दोन्ही नोकिया मोबाईलचा लुक इतका छान आहे की 2010 च्या अगोदर ग्राहक त्याला सर्वाधिक पसंती देत. आता एचएमडी ग्लोबल नोकिया 6600 आणि नोकिया 3660 यासह पुन्हा एकदा ग्राहकांना विंटेज फोनचा अनुभव देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दिसते. अलीकडेच नोकियाचे हे दोन्ही स्मार्टफोन एसआयआरआयएमसह अनेक साइटवर दिसायला सुरुवात झाली आहे.

Advertisement

लोकप्रिय टिप्स्टर मुकुल शर्मा यांनीही सिरीम सर्टिफिकेशन साइटवर नोकियाच्या या दोन फोनबाबत माहिती असल्याचे म्हटले आहे. नोकियाचे दोन्ही फोन जाड व वजनदार होते. स्मार्टफोन आल्यानंतर हे प्रीमियम फीचर फोन बंद करण्यात आले होते. आता हा फोन स्मार्टफोन म्हणून लॉन्च केला जाऊ शकतो. ज्याचा लुक पूर्वीसारखाच असू शकेल. परंतु वैशिष्ट्ये नवीन असू शकतात.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply