Take a fresh look at your lifestyle.

कॉफी प्रेमींसाठी महत्वाची बातमी : म्हणून कॉफी का घुट झालाय महाग..!

मुंबई : आता कॉफीप्रेमींच्या खिशालाही मोठा झटका बसणार आहे. कारण, मागील चार-पाच महिन्यांत कॉफीच्या किंमतीत तब्बल 10 टक्क्यांनी वाढ झालेली असतानाच उत्पादन कमी झाल्याने मागणी आणि पुरवठ्याचे गणित बिघडले आहे. त्यामुळे कॉफीच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Advertisement

एडेलवेस वेल्थ रिसर्चच्या अहवालानुसार, कॉफीच्या हंगामात अरेबिकाची 300-330 लाख पिशव्या (एका पिशवीत 30 किलो) आणि रोबस्टा कॉफीचे उत्पादन 160 ते 60 लाख होण्याची शक्यता आहे. 2021-22. मागील वर्षीच्या उत्पादनापेक्षा हे 35-40 टक्के कमी आहे. यंदा संपूर्ण जगात कॉफीचे उत्पादन चालू दशकभरात सर्वात कमी झालेले आहे. जगातील एकूण कॉफी उत्पादनात 70% वाटा अरबी कॉफीचा आहे.

Advertisement

त्यातच भारतासह जगभरात कॉफीप्रेमींची संख्या वाढत आहे. सन 2020 मध्ये भारतात 95 ग्रॅम इतकी कॉफी पिली जात आहे. 2019 मध्ये हीच आकडेवारी प्रतिव्यक्ती 85 ग्रॅम होती. त्यातही अजूनही भारतात कॉफी पिणाऱ्यांची संख्या वाढू शकते. कारण, सध्या जो काही भारतात कॉफीचा वाटा आहे तो शहरी भागात आहे.

Advertisement

मागील वर्षाच्या तुलनेत कॉफीचे उत्पादन कमी होऊन दशकाच्या नीचांकी पातळीवर आल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जगातील केवळ तीन देशांमध्ये 66 टक्के कॉफी उत्पादित होते. त्यापैकी 10 टक्के कॉफी कोलंबियामध्ये, 20 टक्के व्हिएतनाममध्ये आणि तब्बल 36 टक्के ब्राझीलमध्ये उत्पादन होते.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply