Take a fresh look at your lifestyle.

चीनचे भरकटलेले रॉकेट काही तासात पृथ्वीवर कोसळणार, पहा किती विनाश होऊ शकतो..?

नवी दिल्ली : कोरोनानंतर चीनने पुन्हा एकदा अवघ्या जगाला हादरविले आहे. एप्रिलमध्ये अंतराळात सोडलेले एक मोठे रॉकेट चीनच्या नियंत्रणाबाहेर (China Rocket out of control) गेले होते. हे रॉकेट 8 मे रोजी पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करणार होते. त्यानुसार आता काही तासांत हे रॉकेट पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. ते एखाद्या शहरावर पडल्यास मोठा विनाश होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, चीनने याच रॉकेटवरून भारतातील पेटत्या चितांची खिल्ली उडविली होती.

Advertisement

रॉकेटवर कोणतेही नियंत्रण नसल्याने ते कुठेही कोसळू शकते. ते एखाद्या शहरावर पडले, तर त्यातून होणारा विध्वंस मोठा असेल, असं खुद्द चीनने म्हटले आहे. मात्र, पृथ्वीच्या कक्षेत रॉकेटने प्रवेश करताच, त्याला जाळण्याचा प्रयत्न करण्यात येईल. यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान होण्याचा धोका नसल्याचे चीनने सांगितले नाहीय.

Advertisement

काही मिनिटांपूर्वी चीनचे हे लाँगमार्च-5 बी रॉकेट न्यूयॉर्क, माद्रिद आणि बिजिंगवरून पुढे सरकले आहे. शेवटचे हे रॉकेट चिली आणि न्यूझीलंडच्या आकाशात दिसल होत. हे रॉकेट ९० मिनिटांमध्ये पृथ्वीला प्रदक्षिणा घालत आहे. सेकंदाला 7 किमी असा त्याचा प्रचंड वेग आहे. आज सायंकाळी 4 च्या सुमारास हे रॉकेट पृथ्वीवर कोसळण्याचा अंदाज ‘एअरो स्पेस’ने (Airo space) लावला आहे. हे रॉकेट निर्मनुष्य भागात कोसळले, तर ते एखाद्या विमान अपघातासारखे असणार आहे.

Advertisement

चीनने गेल्याच आठवड्यात ‘स्पेस स्टेशन’ (Space station) बांधण्यासाठी साहित्य ‘लाँगमार्च 5बी’ हे रॉकेट अंतराळात पाठविले होते. हे रॉकेट 29 एप्रिलला लाँच करण्यात आले होते. हे चीनचे सर्वात मोठे ‘कॅरिअर रॉकेट’ आहे. गेल्या वेळी लाँच केलेल्या रॉकेटमुळे देखील धातूच्या मोठ्या मोठ्या सळ्या या रॉकेटमधून बाहेर पडल्या होत्या. त्या पृथ्वीवर कोसळल्याने ‘आयव्हरी कोस्ट’च्या इमारतींना नुकसान झाले होते.

Advertisement

काही सळ्या आकाशात जळाल्या होत्या. आजचे हे रॉकेट ज्या गतीने पुढे जात आहे, ते पाहता ते न्यूयॉर्क आणि माद्रीद किंवा दक्षिणेकडे चिली किंवा न्यूझीलंडच्या बाजुने प्रवेश करू शकते. या रॉकेटचा मार्गच अनियंत्रित झाल्याने ते कधी, कुठे वळेल हेदेखील सांगता येत नाहीय, असे तज्ज्ञ जोनाथन मेगडोबल यांनी सांगितले.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply