Take a fresh look at your lifestyle.

हुश्श.. अखेर चीनचे रॉकेट समुद्रात कोसळले; पहा नेमके काय घडले ते

दिल्ली : अवघ्या जगाच्या काळजाचा ठेका चुकवणारे चीनचे भरकटलेले रॉकेट अखेर समुद्रात कोसळले आहे. रॉयटर्स या जगप्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबाबतची बातमी दिली आहे. एकूणच हे रॉकेट कोसळल्याने ते कुठे कोसळणार आणि किती नुकसान करणार याबाबतच्या अफवा आणि चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे. मात्र, समुद्रात पाडण्याची प्रक्रिया चालू असताना यामुळे किती नुकसान झाले, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.

Advertisement

चीनच्या अनियंत्रित रॉकेटने पृथ्वीवर लँडींग साधेसुधे ठरलेले नाही. हे रॉकेट नष्ट करण्यात आले असून रॉकेटचे अवशेष अरबी समुद्रात आढळले आहेत. चीनचे रॉकेट अरबी समुद्रात कोसळल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. दि. 29 एप्रिलला चीनच्या हाइनान द्वीपवरुन लॉन्च केलेले लॉन्ग मार्च 5बी रॉकेट अंतराळात स्पेस स्टेशन बांधण्यासाठी साहित्य घेऊन जात होते. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रॉकेट अनियंत्रित होऊन पृथ्वीच्या दिशेने निघाल्याने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Advertisement

ANI on Twitter: “Remnants of China’s biggest rocket landed in the Indian Ocean, with the bulk of its components destroyed upon re-entry into the Earth’s atmosphere: Reuters” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply