Take a fresh look at your lifestyle.

चोरच ते.. करोना संकटातही साधली संधी; केली कफनचोरी, पण पोलिसांनी पकडलेच त्यांना..!

लखनौ : जित्याची खोड मेल्याबिगर जात नाही, असे आपण अनेकदा ऐकतोच की. तसलाच प्रकार उत्तरप्रदेश राज्यातील बागपत येथेही उघडकीस आलेला आहे. चोरांची सध्या अनेक ठिकाणी गोची झाली आहे. सर्वजण घरीच असल्याने मग चोरी करायला जाणार तरी कोणत्या बंद घरात. मात्र, चोर हे चोरच असतात. अशावेळी त्यांनी चक्क कफनचोरी करण्याचा फंडा वापरला आहे. मात्र, पोलिसांनी त्या सातही साथीदारांना अटक केली आहे.

Advertisement

स्मशानभूमीतून कफन चोरणाऱ्या सातजणांना बागपतच्या बरौत कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. हे लोक कफनसाठी वापरलेले कापड चोरून ब्रँडेड कंपनीचे लेबल त्यावर लावत असत आणि ते पुन्हा बाजारात विकत असत. आरोपींकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात असे कपडेही जप्त केले आहेत. इंस्पेक्टर अजय शर्मा यांनी सांगितले की, पोलिस तपासणी करत असतांना एक वाहन ब्रांडेड कपड्यांनी भरलेले आढळले. संशयास्पद वाटल्यावर पोलिसांनी कपड्यांचे बिल मागितले. आरोपींना बिल दाखवता आले नाही. जेव्हा पोलिसांनी कसून तपासणी केल्यावर हे लोक कफन चोरून विक्री करणारे असल्याचे समजले. हे लोक स्मशानभूमीतून कफन चोरून नेऊन त्यावर प्रसिद्ध ब्रँडच्या टॅगला जोडून विकत असत.

Advertisement

Krushirang on Twitter: “या चोरांना हजार तोफांची सलामी…! काय दिवस आलेत यार…😭😭😭” / Twitter

Advertisement

पोलिसांच्या चौकशीत असे दिसून आले आहे की, मृतांचे कफन विकण्याचा हा धंदा हे आरोपी जवळपास दोन वर्षांपासून करीत आहेत. कोरोना कालावधीतही त्यांचा हा धंदा असाच चालू राहिला. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करुन तुरूंगात पाठविले आहे. मात्र, चोरांनी या करोनाच्या भीतीमुळे आपला चोरीचा धंदा अजिबात सोडला नव्हता. उलट या कालावधीत मृतांची संख्या वाढल्याने त्यांच्या कफनचोरीच्या धंद्याला बरकत आली होती.

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply