Take a fresh look at your lifestyle.

वाईट बातमी : कारमध्ये खेळताना लागले सेन्ट्रल लॉक आणि चौघा चिमुरड्यांचा झाला मृत्यू

दिल्ली : कार ही अशी वस्तू आहे जिची आता सगळ्यांना गरज आहे. मात्र, अशा यांत्रिक वस्तू काळजीपूर्वक न वापरल्याने नेमके काय होऊ शकते याचे दुर्दैवी उदाहरण म्हणून ही बातमी पहा. कारण, कारच्या मालकाने गाडी योग्य पद्धतीने लॉक न केल्याने त्यात पाच चिमुरडे खेळण्यासाठी घुसले आणि त्यातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची ही घटना अनेकांना वेदनादायी अशीच आहे.

Advertisement

ही घटना आहे उत्तरप्रदेश राज्यातील बागपत येथील. एका गावात ही घटना घडली. एका कार मालकाने उन्हात आपली गाडी पार्क केली होती. मात्र, गादी पार्क करताना त्यांच्याकडून एक काच लावणे राहून गेले होते. त्यातून पाच मुलांनी कारमध्ये प्रवेश केला. मग काचाही खेळताना लावल्या आणि गाडी लॉक झाली. अखेर उन्हातील कारमध्ये उष्ण हवा आणि कारमधील इतर प्लास्टिक वस्तू यामुळे हवा उष्ण आणि उशारी बनल्याने त्यात गुदमरून चौघांचा करूण अंत झाला.

Advertisement

कारमध्ये अडकून पडल्यावर गुदमरत असतानाही या चिमुरड्यांनी मदतीसाठी आर्त हाक दिली. मात्र, दरम्यानच्या काळात कोनिती तिकडे फिरकले नाही. अखेर चौघांचा मृत्यू झाल्यावर एकजण काचा थोपटत असल्याचे एका व्यक्तीच्या लक्षात आल्याने त्याने प्रसंगावधान राखून काचा फोडल्या आणि एका मुलाची दु:ख व्यक्त केले आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत. मृतांच्या मुलांच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी संबंधित कारच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply