Take a fresh look at your lifestyle.

करोना लस घेतलीय तर वाचा ही महत्वाची बातमीही; कारण, माहिती आहे महत्वाची

पुणे : करोना लस घेऊन करोनाकवच मिळाले की कुठेही आणि कसेही बोंबलत फिरायला आपण मोकळे असेच अनेकांना वाटत आहे. मात्र, तसे काहीही नाही. लस घेऊनही करोना विषाणूची बाधा होऊ शकते. मात्र, दरम्यान अशा कवचवाल्या मंडळींना करोना झाल्यास ते सुपरस्प्रेडरही ठरू शकतात.

Advertisement

देशभरात कोरोना लसचे प्रथम किंवा दोन्ही डोस घेतल्यानंतरही त्यांना संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये असे आढळून आले आहे की, असे रुग्ण तुलनेने लवकर बरे होतात आणि गंभीर होण्याची शक्यता कमी असते. मात्र, असे लस घेतलेले रूग्ण लस न घेणार्‍या लोकांसाठी एक मोठा धोका असल्याचे दिसत आहे. ते एक प्रकारचे ‘सुपर स्प्रेडर’ असल्याचे सिद्ध होत आहे. डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी ही चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे लस घेतल्यावरही सामाजिक भान ठेऊन घराबाहेर न  पडता घरात राहावे. घरात आणि घराबाहेर असताना मास्क आणि इतर सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले जात आहे.

Advertisement

कोलकाता येथील पीरलेस हॉस्पिटलचे क्लिनिकल डायरेक्टर (संशोधन व शिक्षणशास्त्रज्ञ) शुब्रोज्योती भौमिक म्हणाले आहेत की, लसचा पहिला डोस घेतल्यावर प्रतिजैविकांची (एंटीबॉडी) पातळी चांगली सेट होण्यासाठी सुमारे सहा-आठ आठवडे लागू शकतात. तसेच दुसरा डोसही आवश्यक आहे. यादरम्यान, त्या व्यक्तीस संसर्गाची लागण होण्याची शक्यता असते. परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये रोगप्रतिकारक असल्याने त्यांना विशेष लक्ष दिसणार नाहीत. मात्र, त्यांच्यामार्फेत घरातील व संपर्कातील अनेकांना संसर्ग वेगाने होऊ शकतो.

Advertisement

संपादन : रुपाली दळवी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply