Take a fresh look at your lifestyle.

आईचे समोसे विकण्यासाठी सोडली ‘गुगल’ची नोकरी, आता पैशात खेळतोय ‘हा’ तरुण!

नवी दिल्ली : गुगल.. जगातील सर्वात मोठी आयटी कंपनी.. ‘गुगल’मध्ये काम करणे प्रत्येकाचे स्वप्न असत; कारण भरपेट पगार, मान-सन्मान आणि कामाचा आनंद येथे मिळतो. पण ‘गुगल’मध्ये नोकरी मिळवणे, म्हणजे येऱ्या-गबाळ्याचे काम नाही. कितीतरी अग्निदिव्ये पार केल्यावर ‘गुगल’चे दार आपल्यासाठी उघडू शकते..

Advertisement

अशा चांगल्या पगाराची, प्रतिष्ठेची नोकरी कोणी सोडू शकतो का.? तेही समोसा विकण्यासाठी.. असे कोणी म्हटले, तरी लोक त्याला वेड्यात काढतील; पण हा ‘सेफ झोन’ सोडण्याचा वेडेपणा एकाने केला. आईच्या हातांनी बनवलेले खमंग समोसे विकण्यासाठी चक्क एकानं ‘गुगल’च्या नोकरीवर लाथ मारली.. पण ‘लाथ मारीन तिथं पाणी काढीन..’ अशी जिगर असल्याने समोसा विकूनही तो यशस्वी ‘बिझनेस मॅन’ झाला. आता तर तो पैशांच्या राशीत लोळतोय..

Advertisement

मुनाफ कापडिया, असे या तरुणाचे नाव.. नोकरीसाठी कंपन्यांच्या दारोदार फिरणारा तरुण ते ‘द बोहरी किचन’चे मालक… हा मुनाफ याचा प्रवास थक्क करणारा आहे.. मुनाफने एमबीएचे शिक्षण घेतले. नंतर काही कंपन्यांमध्ये नोकरी केली आणि त्यानंतर परदेशात गेले. परदेशात काही कंपन्यांमध्ये मुलाखती दिल्यानंतर मुनाफला ‘गुगल’मध्ये चांगली नोकरी मिळाली. मात्र, त्यांचे मन या कामात रमत नव्हते. ‘गुगल’मध्ये काही वर्षे काम केल्यावर मुनाफला वाटले, की यापेक्षाही आपण एखादे चांगले काम करू शकतो. त्यानंतर ते घरी परतले.

Advertisement

मुनाफ म्हणतो, की “आई नफिसाला टिव्ही पाहण्याची खूप आवड.. टिव्हीसमोर ती तासन तास बसून राहत असे. त्यातही तिला ‘फूड शो’ (Food Show) पहायला जास्त आवडायचे. ते शो पाहून ती घरी छान खाद्यपदार्थ बनवायची. आईकडून टिप्स घेतल्यावर मुनाफने ‘रेस्टॉरंट’ उघडण्याची योजना आखली. बर्‍याच लोकांना आईच्या हातचे जेवण दिले. प्रत्येकाने त्यांची प्रशंसा केली.

Advertisement

समोसा.. हा मुनाफचा ‘द बोहरी किचन ट्रेडमार्क’ आहे. केवळ मुंबईतच नाही, तर देशभरात तो त्यासाठी प्रसिद्ध आहे. मुनाफच्या रेस्टॉरंटमध्ये केवळ समासोच मिळत नाही. मात्र, समोसा हा त्याचा ट्रेडमार्क बनला आहे. मुनाफ दाऊदी बोहरा समुदायाचे.. या समाजाचे काही पदार्थ अतिशय छान आहेत. उदाहरणार्थ, मटण समोसा, नरगिस कबाब, डब्बा गोश्त आणि कढी चावल. मुनाफ हे सर्व पदार्थ त्याच्या रेस्टॉरंटमध्ये ठेवतो.

Advertisement

अवघ्या एका वर्षापूर्वी त्याच रेस्टोरंट सुरू झाले असून, त्यांची उलाढाल 50 लाखांवर गेली आहे. मुनाफला पुढील काही वर्षांत ते 3 ते 5 कोटीपर्यंत बिझनेस वाढवायचा आहे. “बोहरी किचन”च्या रुचकर पदार्थांची अनेक सेलिब्रिटींनी कौतुक केले आहे. आशुतोष गोवारीकर आणि फराह खान सारख्या प्रसिद्ध सेलिब्रिटींनीही ‘द बोहरी किचन’चे रुचकर पदार्थ खाण्याचा आनंद लुटला असून, सोशल मीडियावर त्याचे कौतुक केले आहे.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply