Take a fresh look at your lifestyle.

मतदानाचा बाजार : भाव थेट गेलाय 1 कोटींवर; पहा कुठली निवडणूक झालीय इतकी कॉस्टली..!

दिल्ली : निवडणूक म्हटले की बाता लोकशाहीच्या आणि कृती आर्थिक हुकुमशाहीची. असेच चित्र सध्या भारतभर आहे. कोणतीही निवडणूक त्याला अपवाद असेल तर त्याचेही वर्ल्ड रेकॉर्ड बनेल. तर, अशा पद्धतीने सध्या नुकत्याच पाच राज्यातील विधानसभा आणि काही ठिकाणच्या पंचायत स्तरीय निवडणुका दणक्यात झाल्या. त्याचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींमधून पदाधिकारी निवडणूक होत आहे. त्याच्या मतदारांचा भाव थेट 1 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

Advertisement

उत्तरप्रदेश पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये अपक्षांचा दबदबा आहे. कारण, अनेक ठिकाणी राजकीय पक्षांच्या उमेदवारांपेक्षा सामान्य मतदारांनी अपक्षांना कौल दिला आहे. याच कौल लावलेल्या अपक्षांचे आता अच्छे दिन आलेले आहेत. येथील जिल्हा पंचायत सदस्याच्या (डीडीसी) मतदानाचा भाव ५० लाख ते एक काेटी रुपये, तर ब्लाॅकप्रमुखासाठीच्या (तालुका पंचायत समिती) मतदानाचा भाव ३ ते ५ लाख रुपये इतका झालेला आहे.

Advertisement

Krushirang on Twitter: “करोना रुग्णांच्या जीवाशी खेळताना थेट ऑक्सिजन सिलेंडर घोटाळा झाल्याचे उघडकीस आलेले आहे. #मराठी #बातम्या #महाराष्ट्र #भारत #LatestNews #Maharashtra #MarathiNews #News #India #trending #health #CoronavirusIndia #Corona2ndWave #COVIDEmergency2021 https://t.co/j6QQTZenPr” / Twitter

Advertisement

पंचायत अध्यक्ष अाणि ब्लाॅकप्रमुखांच्या निवडणुकीसाठी पैसे देऊन मते खरेदी करण्याची परंपरा असल्याचे माजी न्यायमूर्ती सी. बी. पांडेय यांनी म्हटले आहे. राज्यातील ६० पेक्षा जास्त जिल्ह्यांत जिल्हा पंचायत अध्यक्षपदासाठी अपक्ष सदस्यांचा पाठिंबा मिळणे निर्णायक ठरणार आहे. एकूणच यामुळे या निवडणुकीत मतदारांना भाव आलेला आहे. प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीवर झालेल्या भरमसाट खर्चावर काेराेना महामारीचा काेणताही परिणाम झालेला नसून स्काॅर्पिअो व बाेलेराेसारख्या गाड्या देण्याचाही प्रयत्न अगदीच सहजपणे केला जात आहे.

Advertisement

Krushirang on Twitter: “#मराठी #बातम्या #महाराष्ट्र #भारत #LatestNews #Maharashtra #MarathiNews #News #India #trending #health #covid19 #corona #CoronavirusIndia #Corona2ndWave #COVIDEmergency2021 https://t.co/VczsX7BFCW” / Twitter

Advertisement

पंचायत राज विभागाने जिल्हा पंचायत अध्यक्ष व विभाग पंचायत प्रमुखांच्या निवडणुका २० ते २७ मे दरम्यान घेण्याचा प्रस्ताव तयार केला अाहे. ब्लाॅकप्रमुखांच्या निवडणुका अाधीच म्हणजे १४ ते १७ मेदरम्यान करण्याची याेजना अाहे. उच्च न्यायालयाच्या अादेशानुसार पंचायत निवडणुका ३० मेपर्यंत घ्यायच्या अाहेत.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply