Take a fresh look at your lifestyle.

करोना अपडेट : म्हणून उत्तरप्रदेशमध्ये कागदोपत्री आहेत कमी रुग्ण; पहा नेमके काय आहे इथले वास्तव

मुंबई : सध्या कोणत्याही मुद्द्यावर महाराष्ट्राची तुलना गुजरात आणि उत्तरप्रदेश या राज्यांशी करणाची सवय सोशल मिडीयावाल्यांना जडली आहे. आताही महाराष्ट्रात प्रत्येक दिवशी 60 हजारांपेक्षा अधिकचे करोना रुग्ण सापडत असताना उत्तरप्रदेश राज्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कशी रुग्णसंख्या नियंत्रित ठेवली याचे दाखले भाजपचे कार्यकर्ते देत असतात. त्यावरून महाराष्ट्राचे मुख्यंमत्री उद्धव ठाकरे रडारवर आहेत. मात्र, उत्तरप्रदेशचे वास्तव वेगळे असल्याचे दैनिक भास्कर या राष्ट्रीय माध्यम समूहाने बातमीतून मांडले आहे.

Advertisement

महाराष्ट्रातील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात राज्य सरकारची आरोग्य यंत्रणा कमी पडली आहे. तर, लसीकरण आणि इतर मदतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्र सरकार खूपच मागे असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झालेले आहे. उत्तरप्रदेश राज्यातही तसेच चित्र आहे. याबाबत भास्कर समूहाने ग्राउंड रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. त्यात अनेक गावांमध्ये शेकड्याने रुग्ण असून त्यांची करोना चाचणी केली जात नसल्याच्या वास्तवावर बोट ठेवण्यात आलेले आहे. 5 महत्वाच्या आणि मोठ्या जिल्ह्यातील तब्बल 150 गावांमध्ये जाऊन भास्करच्या रिपोर्टर मंडळींनी हा अहवाल बनवला आहे.

Advertisement

वाराणसी म्हणजे धार्मिकदृष्ट्या महत्वाचे ठिकाण. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खासदारकीचा मतदारसंघ. याच जिल्ह्याच्या 8 ब्लॉकमधील (तालुके) 22 गावांमध्ये ही टीम गेली होती. त्यात त्यांनी म्हटले आहे की, प्रत्येक दुसऱ्या घरामध्ये सर्दी, पडसे, ताप आणि खोकला यांचे रुग्ण आढळत आहेत. कोणीही तपासणी करीत नाही. तसेच सरकारी आरोग्य यंत्रणेनेही या नागरिकांची तपासणी केलेली नाही. येथील स्थानिक मेडिकल स्टोअरमध्ये सध्या सर्दी-पडश्यावरील औषधेही मिळत नाहीत. औषधांचा तुटवडा ही गंभीर समस्या आहे. अनेक ठिकाणी मृत्यू झाल्यावरही संबंधित रुग्णांची करोना चाचणी न करताच अंत्यविधी करण्यात आलेले आहेत. अशा मृतांची संख्या खूप मोठी आहे.

Advertisement

Krushirang on Twitter: “पत्रातील मुद्दे आणि आरोप गंभीर आहेत.. #मराठी #बातम्या #महाराष्ट्र #भारत #LatestNews #Maharashtra #MarathiNews #News #India #trending #health #CoronavirusIndia #Corona2ndWave #COVIDEmergency2021 #OxygenCylinder #mumbai #PoliticsOnVaccine https://t.co/cpGnNUh69O” / Twitter

Advertisement

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर जिल्ह्यात 50 गावांमध्येही असेच चित्र आहे. या भागात किमान 5 हजार लोकांना करोना आजाराशी संबंधित लक्षणे आढळली आहेत. गाजीपुरच्या 20 गावांमध्ये महिन्यात तब्बल 59 जणांचा करोनाने मूत्यू झालेला आहे. तपासणी न झालेले मृत्यूही खूप आहेत. आजमगढ येथेईल ग्रामीण भागात कर्फ्यू असूनही मागच्या दराने सर्वकाही चालू आहे. इथे तर 30 गावांमध्ये प्रत्येक तासाला 2-3 जणांचा मृत्यू होत असल्याचे विदारक चित्र आहे. मऊ नावाच्या जिल्ह्यातही दुर्दैवाने असेच चित्र आहे. यामुळे इथेही कागदोपत्री संक्रमित कमी असतानाच वास्तवात घरोघरी आजारी रुग्ण आहेत. राज्याच्या ग्रामीण भागात जाऊन सध्या सर्वेक्षण केले जात आहे. त्यामध्ये 48 लाख 63 हज़ार 298 लोकांमध्ये 68 हज़ार 109 लोकांना करोनाची लक्षणे असल्याचे दिसले आहे. त्यांना औषधोपचार दिले जात असल्याचे राज्य सरकारने कबुल केले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

Read Report Here : Uttar Pradesh (UP) Coronavirus Report LIVE Update; Yogi Adityanath | Nobody Wants COVID Test In UP | हर दूसरे घर में 3-4 लोगों में कोरोना के लक्षण, लेकिन कोई टेस्ट कराना नहीं चाहता; मेडिकल स्टोर पर दवाएं मिलना भी मुश्किल – Dainik Bhaskar

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply