Take a fresh look at your lifestyle.

मधमाश्यांच्या साहाय्याने ‘कोरोना टेस्ट’, काही क्षणात रिपोर्ट मिळणार.. पहा कोणी लावलाय शोध..?

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतात दररोज 4 लाख रुग्ण आढळत आहेत. नागरिकांच्या ‘आरटीपीसीआर’ टेस्ट (Corona RT-PCR Test) करणाऱ्या लॅबवर दबाव वाढला आहे. मात्र, रिपोर्ट मिळण्यासाठी रुग्णांना 5 ते 7 दिवस वाट बघावी लागते. सध्या कोरोना टेस्टसाठी RT-PCR हाच एक योग्य पर्याय मानला जात होता; पण आता कोरोना टेस्टसाठी वैज्ञानिकांनी एक अनोखा पर्याय शोधला आहे. तो म्हणजे मधमाशीचा वापर कोरोना टेस्टसाठी केला जाणार असून, त्याचा रिपोर्ट काही क्षणातच मिळणार आहे.

Advertisement

‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या रिपोर्टनुसार, मधमाश्यांना प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. या मधमाश्या (Bees) कोरोना विषाणूला त्याच्या वासावरून शोधू शकतात. कोरोना पेशंटच्या समोर येताच, या विषाणूच्या वासाने मधमाश्या आपली जीभ बाहेर काढतात. त्यावरुन तो रुग्ण पॉझिटीव्ह (Positive) असल्याचं मानलं जातं. कोरोनाच्या RT-PCR टेस्टचे रिपोर्ट यायला वेळ लागतो. त्यामुळे ही रॅपिड टस्ट फायदेशीर ठरणार आहे. या टेस्टला रॅपिड टेस्ट (Rapid Test) म्हटलं जातं.

Advertisement

वैज्ञांनिकांनी जवळपास 150 मधमाश्यांना ‘पॉवलोवियन कंडीशनिंग’ पद्धतीने प्रशिक्षीत केलं आहे. या मधमाश्यांना दरवेळी कोरोना व्हायरसच्या वासाचा सामना करण्यासाठी साखरेच पाणी देण्यात आलं; पण व्हायरस नसणाऱ्या नमुन्यासह त्यांना काहीही दिलं गेलं नाही. त्यामुळे त्यांना कोरोना व्हायरसचा वास आल्यावर जीभ काढण्याची सवय लागली. त्यामुळे वास असताना पण साखरेचं पाणी न मिळाल्यास त्यांना त्यांना जीभ काढण्याची सवय लागली.

Advertisement

कोरोना विषाणूची (Corona virus) ओळख पटविण्यासाठी मधमाश्यांचा वापर कमी उत्पन्न असलेल्या देशांना फायदेशीर ठरेल. ज्या देशांकडे ‘पॉलिमरायझेशन चेन’ (Polymerization chain) टेस्टसाठी आवश्यक साहित्य आणि तंत्रज्ञान नाही. अशा देशांत ही पद्धत वापरता येईल.

Advertisement

वॅगनिनजेन यूनिव्हर्सिटी (Wageningen University) प्राध्यापक आणि संशोधनाचं नेतृत्व करणारे विम वॅनडर पोयल (Wim Wander Poyle) यांच्या मते, जगातल्या काही गरीब देशांकडे ‘पॉलिमरायझेशन टेस्ट’चं साहित्य उपलब्ध नाही. मधमाश्या सगळीकडेच उपलब्ध असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी अशा प्रकारे मधमाश्यांना प्रशिक्षीत करणं शक्य आहे.

Advertisement

कोरोनामुळे बऱ्याच देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. या महामारीच्या काळात सरकारचा खर्चही वाढत आहे. अशा परिस्थितीत या नविन संशोधनामुळे खर्चाचा ताण कमी होणार आहे. शिवाय जास्त काळ रिपोर्टची वाट पहावी लागणार नाही.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply