Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाची भीषणता वाढण्यामागे ‘हा’ घटक ठरला महत्वपूर्ण; तुम्हीच पहा

नवी दिल्ली : भारतात कोरोना संकट अचानक तीव्र झाले, की हळूहळू, याचा शोध तज्ज्ञ घेत आहेत. पण यापुढेही जाऊन महत्त्वाचे कारण समोर आले आहे, ते म्हणजे, हवामान बदल, हवा प्रदूषण आणि भारतातील जीवाश्म इंधन, म्हणजेच पेट्रोल-डिझेल-कोळसा आदींच्या वापराकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळेच कोरोनाचे संकट अधिक गडद झाल्याचे म्हटले जात आहे.

Advertisement

‘टाईम्स’ (Time Magazine) या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मासिकाने याबाबत अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, विज्ञान आणि पर्यावरण केंद्राच्या कार्यकारी संचालक अनुमिता रॉय-चौधरी म्हणाल्या, की प्रारंभी वैज्ञानिकांनी वायूप्रदूषण आणि कोरोनातील संबंध उघडकीस आणला. वाढत्या वायू प्रदूषणामुळे कोरोना पसरण्याचा धोका जास्त आहे. भारतात अशी अनेक शहरे आहेत, की जी जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये गणली जातात. अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांची श्वसनसंस्था प्रदूषणामुळे आधीच कमकुवत झाली आहे. आता अशा लोकांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्या फुफ्फुसांची अवस्था अधिकच खराब होते.

Advertisement

भारतातही वायू प्रदूषण आणि कोरोनाच्या परस्पर संबंधावर बरीच संशोधने झाली. परंतु, त्यांना फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी संशोधन ‘जर्नल’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, लोकांवर ‘पेरीक्युलेट मॅटर’चे (पीएम प्रदूषण) मोठे दुष्परिणाम झाल्याचे आढळले आहे. हे प्रदूषण पेंढा जाळणे, वाहनांचा धूर आणि उद्योगांच्या धुरामुळे होते. संपूर्ण जगात कोरोना विषाणूमुळे बरेच लोक मरण पावले. त्यातील 15 टक्के लोक वायूप्रदूषणामुळे आधीच तीव्र आजारांना बळी पडले होते. सतत हवेच्या प्रदूषणासह एखाद्या ठिकाणी राहणे किंवा तेथून जाणे बर्‍याच प्रकारच्या रोगांना कारणीभूत ठरू शकते. उदाहरणार्थ, दमा, मधुमेह किंवा फुफ्फुसे किंवा हृदयाशी संबंधित कोणताही आजार. या सर्व रोगांमुळे कोरोना संक्रमणादरम्यान रुग्णाची परिस्थिती आणखी गंभीर होते.

Advertisement

जयपूरच्या मालवीय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे केलेल्या अभ्यासानुसार, कोविड-19 च्या वाढत्या रुग्णसंख्येचा वायूप्रदूषण आणि हवेतील आर्द्रता, आदी हवामानातील बदल यांसारख्या घटनांचा थेट संबंध आहे. दिल्लीतील कोरोनाची परिस्थिती गंभीर करण्यामागे हीच कारणे आहेत. जागतिक बँकेच्या अभ्यासानुसार, जर पर्टिक्युलेट मॅटरशी आपला संपर्क 1 टक्क्याने वाढल्यास कोरोनामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या 5.7 टक्क्यांनी वाढेल.

Advertisement

जागतिक बँकेच्या अभ्यासात भारत सरकारला स्पष्ट सल्ला दिला होता, की देशात स्वच्छ इंधन प्रणालीची त्वरित व्यवस्था करावी लागेल. वाहतूक व्यवस्थेमुळे होणारे वायूप्रदूषण कमी करावे लागेल. यानंतरच आपण लोकांना कोरोनापासून वाचण्यासाठी मास्क वापरण्याची आणि लसीकरणाची शिफारस करू शकता. भारतातील हवेची गुणवत्ता सुधारण्याची गरज असल्याचे देशातील वैज्ञानिकांचे स्पष्ट मत आहे. यातून दोन फायदे होऊ शकतात – पहिला साथ वेगाने कमी होईल आणि दुसरा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होईल.

Advertisement

भारतातील वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या तीव्र आजारांमुळे दरवर्षी कोट्यवधी लोकांचा अकाली मृत्यू होतो. चीनमध्येही असेच घडते. अमेरिकेसारख्या कठोर पर्यावरणीय नियम असलेल्या देशातसुद्धा दरवर्षी 1 लाखाहून अधिक लोक वायू प्रदूषणामुळे मृत्यू पावतात. वायू प्रदूषणातील पेरीक्युलेट पदार्थ याला सर्वाधिक कारणीभूत ठरतात. नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसनेही यासंदर्भातील एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement

  कृषीरंग मार्केट अपडेटशेती-मातीच्या बातम्या, लेखमाहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

–  | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply