Take a fresh look at your lifestyle.

तिच्यासाठी काही पण..! लग्नात नवरीसह नवरोबानेही घातले मंगळसूत्र, पहा कुठे घडलाय हा प्रकार?

मुंबई : भारतीय हिंदू रिवाजानुसार लग्नांत नवरदेवाने वधूला मंगळसूत्र घालणे, ही सर्वपरिचित बाब आहे. मात्र, मुंबईत एका वधू-वरांनी एकमेकांना मंगळसूत्र घालून हा विधी पार पाडला. या जोडप्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. काहीनी त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले, तर काहींनी या जोडप्याला मोठ्या प्रमाणात ट्रोलही केले आहे.

Advertisement

शार्दुल कदम आणि तनुजा असे या जोडप्याचे नाव आहे. शार्दुल आणि तनुजा एकमेकांना कॉलेजमध्ये भेटले होते; पण त्यांची प्रेमकथा पदवीनंतर चार वर्षांनंतर सुरू झाली. ‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत शार्दुलने आपल्या प्रेमकथेविषयी सांगितले. “आम्ही एकमेकांशी अनपेक्षितपणे संपर्क साधला. तनुजा हिमेश रेशमियाची गाणी इंस्टाग्रामवर शेअर करायची आणि कॅप्शनमध्ये लिहायची – टॉर्चर. मी याला उत्तर द्यायचो – महाटॉर्चर. अशाप्रकारे आमचे संभाषण सुरू झाले.”

Advertisement

काही काळानंतर दोघांची भेट झाली, तेव्हा त्यांनी ‘फेमिनिझम’ (feminism) विषयी चर्चा केली. शार्दुल स्वतःला ‘हार्डकोअर फेमिनिस्ट’ (Hardcore Feminist) म्हणवतो. आई-वडिलांना आपल्या नात्याविषयी सांगण्यापूर्वी हे दोघे वर्षभरापासून एकमेकांना डेट करत होते. 2020 सप्टेंबरपासून त्यांनी लग्नाचा विचार सुरू केला.

Advertisement

शार्दुल म्हणतो, ‘मी तनुजाला सांगितले की, फक्त मुलीनेच मंगळसूत्र का घालावे? याला काही अर्थ आहे? आम्ही दोघेही समान आहोत, म्हणून मीही लग्नाच्या दिवशी मंगळसूत्र घालेन.’ तथापि, शार्दूलच्या या निर्णयामुळे त्याचे पालक आश्चर्यचकित झाले. त्यांच्या निर्णयावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. परंतु, शार्दुलने त्यांचे न ऐकता ठरवल्याप्रमाणे केले. एकत्र मंगळसूत्र परिधान केल्याने समानता दिसून येते, असे तो म्हणतो.

Advertisement

इतकेच नाही, तर शार्दुलने तनुजाच्या घरातील सदस्यांची भेट घेतली आणि लग्नाचा खर्चही दोन्ही परिवारांमध्ये अर्धा-अर्धा वाटण्याचे ठरविले. लग्नाच्या एक दिवस आधी, तनुजाने शार्दुलला विचारले, की लग्नानंतरही आपण मंगळसूत्र घालणार काय? त्यावर, शार्दुलने होकार दिला. त्यांचे लग्न चांगल्याप्रकारे पार पडले. परंतु, लग्नातले काही पुरुष अतिथी नाराज झाले. पण त्यांना काही बोलता आले नाही. ही बाब सोशल मीडियावर येताच लोकांनी टोमणे मारण्यास सुरुवात केली.

Advertisement

या जोडप्याचा हा ‘मंगळसूत्र सोहळा’ फोटोसह सोशल मीडियावर आला, तेव्हा ‘आता साडी नेसा,’ असे टोमणे मारण्यास लोकांनी सुरुवात केली, असे शार्दुल म्हणाला. मात्र, इन्स्टाग्रामवर त्याच्या बऱ्याच फॉलोअर्सना हा निर्णय आवडला. त्यांनी त्याबाबत सकारात्मक दृष्टीकोन दर्शविला.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

– | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply