Take a fresh look at your lifestyle.

करोना अपडेट : तर येणार महाराष्ट्राचे स्वतंत्र अॅप्लिकेशन; पहा नेमका काय होणार फायदा

पुणे : कोरोना लसीकरण कार्यक्रमासाठी राज्यांना त्यांचे स्वतःचे मोबाईल अॅप्लिकेशन विकसित करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. लसीकरण करण्यासाठी सध्या लोकांना कोविन प्लॅटफॉर्मवर नोंदणी करावी लागत आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून म्हटले आहे की, देशात सर्वात जलद आणि कार्यक्षम लसीकरण अभियान महाराष्ट्रात सुरू आहे. त्यासाठी स्वतंत्र अॅप्लिकेशन आवशयक आहे.

Advertisement

ठाकरे यांनी पत्रात लिहिले आहे की, जेव्हा 18-45 वर्षे वयोगटातील लसीकरणाची योजना आखली तेव्हा कोव्हिन अॅप अचानक बंद पडले. देशभरातून त्यावर नोंद घेण्याचा प्रयत्न केल्याने ही संख्या वाढली आहे. 18 वर्षावरील नोंदणीच्या पहिल्याच दिवशी कोव्हिन अॅप क्रॅश झाल्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. याकडे लक्ष वेधातानाच देशाची लोकसंख्या आणि लोकांची सोय लक्षात घेऊन राज्यनिहाय मोबाईल कोव्हिन अॅप आवश्यक आहेत. याला कोव्हिन अॅप किंवा इतर वेगळे असेही नाव असू शकते.

Advertisement

अॅप क्रॅश होण्याची अशी परिस्थिती टाळण्यासाठी ठाकरे यांनी केंद्र सरकारला विनंती केली आहे की, राज्यांना त्यांची स्वतंत्र अॅप्स तयार करण्याची परवानगी द्यावी. याचा डेटा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाला सामायिक करता येतील. ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात लस पुरवठा हे एक मोठे आव्हान असल्याचे सांगितले आहे. केंद्राने मान्यता दिल्यास मगच असे राज्यनिहाय स्वतंत्र अॅप  येणार आहे. पत्राचे मुद्दे असे :

Advertisement
  1. शक्य झाल्यास राज्यांना एकाच वेळी आवश्यक साठा खरेदी करायला मदत व्हावी.
  2. लस बनविणार्‍या कंपन्यांकडे जास्त साठा नसल्याने याबाबत सामंजस्य आवश्यक आहे.
  3. जर इतर लस तयार करणार्‍या कंपन्यांकडूनही राज्यांना लस घेण्याची परवानगी दिली गेली तर थोड्या काळामध्ये मोठ्या संख्येने लोकांना लसी दिली जाऊ शकते
  4. असे झाल्यास यामुळे तिसर्‍या लाटेचा परिणाम कमी होईल.
  5. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) प्रत्येक राज्यातील एफडीएसाठी वैद्यकीय चौकट आखू शकते ज्या अंतर्गत जगभरात उपलब्ध लसी गोळा करता येतील.

संपादन : सुनील झगडे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply