Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकारचा मोठा निर्णय.. आता ‘या’ योजनेतून होणार कोरोनावर उपचार!

मुंबई : कोरोनाबाधित रुग्णावर उपचारांसाठी पैश्यांची तजवीज करताना मोठी कसरत करावी लागत आहे. लॉकडाऊनमुळे रोजगार आणि उत्पन्नावर परिणाम झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या नाकीनऊ येत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत (Aayushman Bharat) किंवा पंतप्रधान जनआरोग्य योजनेतून लाभ मिळू शकतो. या योजनेचा कसा लाभ घ्यायचा, ते जाणून घेऊ…

Advertisement

आयुष्मान भारत योजना ‘पंतप्रधान जनआरोग्य योजना’ म्हणूनही ओळखली जाते. काही राज्य सरकारांनी या योजनेची व्याप्ती वाढवली असून, त्यात ऑक्सिजन पुरवठा (Oxygen Supply) आणि कोरोनावरील औषधोपचारांचा समावेश केला आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत देशातील गरजू 10 लाख कुटुंबांना लाभ मिळतो. या योजनेतून 50 कोटी लोकांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य विम्याचा लाभदेखील मिळतो.

Advertisement
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी
    – ग्रामीण भागातील (Rural Area) ज्या नागरिकांकडे स्वतःचे पक्के घर नाही, अशी व्यक्ती पात्र ठरते.
    – कुटुंबात कोणीही वयस्कर (16 ते 59 वर्षे) व्यक्ती नाही.
    – जे कुटुंब महिला चालवतात.
    – कुटुंबात कोणी दिव्यांग असेल तर…
    – कुटुंब अनुसुचित जाती- जमातीतील असेल तर..
    – व्यक्ती भूमिहीन/मजूर, बेघर, आदिवासी किंवा कायदेशीर मान्यता असलेला पारंपरिक मजूर असेल तर..
    – शहरी भागातील (Urban Area) निराधार, कचरा उचलणारा कामगार, घरकाम करणारी व्यक्ती, फेरीवाले, प्लंबर, गवंडी, कामगार, पेंटर, वेल्डर, सुरक्षा रक्षक, हमाल, सफाई कामगार.

खासगी रुग्णालयांतही या योजनेचा लाभ मिळू शकतो. त्यात कॅन्सर शस्त्रक्रिया, रेडिएशन थेरपी, केमोथेरपी, हृदयाशी संबंधित शस्त्रक्रिया, मणक्याची शस्त्रक्रिया, दातांची शस्त्रक्रिया, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया यांसह एमआरआय (MRI) आणि सीटी स्कॅन (CT Scan) सारख्या तपासण्यांचा योजनेत समावेश आहे. सर्दी, खोकला, तापासारख्या आजारांचा या योजनेत समावेश नाही. परंतु, कोरोनाची हीच लक्षणे असल्याने त्याचा समावेश योजनेत आहे.

Advertisement

कोणत्याही आजारावर इलाज करण्यासाठी रुग्णाला आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्याकरिता एक दिवस रुग्णालयात भरती व्हावे लागते. तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह असाल आणि उपचारांसाठी रुग्णालयात भरती झाला असाल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो. योजनेसाठी तुमची पात्रता तपासण्याकरिता तुम्ही http://www.pmjay.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन किंवा 14555, 1800111565 या हेल्पलाईवर संपर्क साधू शकता. कोरोनामुळे खासगी रुग्णालयात ‘क्वारंटाईन’ व्हावे लागले, तरी त्याचा खर्च या विम्यात कव्हर होईल.

Advertisement

आयुष्मान भारत योजनेच्या पॅनेलला देशभरातील खासगी रुग्णालये जोडण्यात आली आहेत. याबाबतची माहिती आॅनलाईन किंवा हेल्पलाईन क्रमांकाच्या माध्यमातून घेऊ शकता. त्यानंतर या रुग्णालयातील एक आयुष्मान मित्र किंवा आरोग्य मित्र तुम्हाला दस्तावेज तपासणीसाठी मदत करेल.

Advertisement
  •  आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-कार्ड किंवा अन्य दस्तावेज सादर करावा लागतो.
  • आधार कार्ड (Aadhar Card), मतदार कार्ड किंवा रेशनकार्ड पैकी एक ओळखपत्र सादर करावे लागते.
  • आरोग्यमित्र पात्र व्यक्तीला रुग्णालयात मोफत उपचारांसाठी सर्वतोपरी मदत करतात.
  • रुग्णालयात भरती होण्यापूर्वीचे 3 दिवस आणि नंतरच्या 15 दिवसांपर्यंत उपचार आणि औषधे मोफत मिळतात.
  • योजनेत 1393 पॅकेजचा समावेश करण्यात आला आहे.
  • रुग्णालयात आयसीयू, लॅबोरेटरी तपासण्या, रुग्णालयात राहण्याचा खर्च आदी बाबी कव्हर होतात.

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply