Take a fresh look at your lifestyle.

नियमात झालाय महत्वाचा बदल; पहा करोना रुग्णांच्या काळजीपोटी कोणता निकष बदलला ते

मुंबई : करोना केअर सेंटरमध्ये उपचार घेण्यासाठी अगोदर पॉजिटिव रिपोर्ट असावा लागतो. अनेकदा अँटिजेन कीट उपलब्ध नसताना किंवा आरटीपीसीआर अहवाल येण्यास 1-3 दिवस लागल्याने करोना रुग्णांना वेळीच उपचार मिळत नाहीत. मग उपचार येईपर्यंत त्यांची तब्बेत आणखी ढासळते आणि परिणामी मृत्यूची टक्केवारीही वाढते. हेच दुष्टचक्र रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य विभागाने नियमात महत्वाचा बदल केला आहे.

Advertisement

(2) Krushirang on Twitter: “चाचणीत असे आढळले आहे की यामुळे रुग्णाच्या ऑक्सिजनची पातळीही चांगली सुधारते. #मराठी #बातम्या #महाराष्ट्र #भारत #LatestNews #Maharashtra #MarathiNews #News #India #trending #health #CoronavirusIndia #Corona2ndWave #COVIDEmergency2021 #OxygenCylinder https://t.co/CRr5xwVdtJ” / Twitter

Advertisement

आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये रुग्ण भरती करण्याचे धोरण बदलले आहे. कोविड सेंटरमध्ये दाखल होण्यासाठी रूग्णांना पॉजिटिव रिपोर्ट दाखविणे आता आवश्यक नाही. म्हणजेच आता संशयित रुग्णही कोविड सेंटरमध्ये दाखल होऊ शकतील. त्यांना संशयित रूग्णांच्या वॉर्डात ठेवले जाईल. आरोग्य मंत्रालयाच्या नवीन धोरणात हे नियम आहेत :

Advertisement
  1. कोरोनाचा संशय असलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर किंवा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलच्या सस्पेक्ट वॉर्डमध्ये दाखल केले जाऊ शकते.
  2. कोणत्याही रुग्णाची सेवा नाकारली जाऊ शकत नाही. यात ऑक्सिजन आणि आवश्यक औषधेदेखील समाविष्ट आहेत. जरी रुग्ण इतर शहराचा असेल, तरीही त्याला उपचार नाकारले जाऊ शकत नाहीत.
  3. कोणत्याही रुग्णाला प्रवेश नाकारला जाऊ शकत नाही. आवश्यकतेनुसार रुग्णालयात प्रवेश देणे बंधनकारक आहे.

(2) Krushirang on Twitter: “जेनेक्सपर्ट (Genexpert) चाचणी ही सर्वोत्कृष्ट आहे. पूर्वी टीबी शोधण्यासाठी याचा वापर केला जात असे. #मराठी #बातम्या #महाराष्ट्र #भारत #LatestNews #Maharashtra #MarathiNews #News #India #trending #health #CoronavirusIndia #Corona2ndWave #COVIDEmergency2021 https://t.co/ikooBHP1aA” / Twitter

Advertisement

कोरोनामुळे त्रस्त असलेले रूग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी सरकारने शुक्रवारी आणखी एक निर्णय घेतला आहे. कोरोना रूग्णांवर उपचार करणार्‍या रुग्णालये, दवाखाने आणि कोविड केअर सेंटरमध्ये आता दोन लाख रुपयांहून अधिक रोख रक्कम घेण्यास सूट असेल. ही सवलत 31 मे पर्यंत असेल. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) एक अधिसूचना जारी केली असून असे म्हटले आहे की अशा संस्थेने रुग्ण आणि देयकाचे पॅन किंवा आधार कार्ड घ्यावे लागेल. तसेच, रुग्ण आणि पैसे देणाऱ्या व्यक्तीच्या नात्याबद्दल माहिती द्यावी लागते.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply