Take a fresh look at your lifestyle.

गृहमंत्री वळसे पाटील यांनी मराठा संघटनांना केले ‘हे’ महत्वाचे आवाहन; ‘त्यांनी’ व्यक्त केली खंतही

मुंबई : मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द झाल्याने सध्या राज्यभरात सामाजिक तणाव आहे. करोना काळात मराठा संघटनांनी संयमाने यावर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. मात्र, तरीही आतापर्यंत राखलेली शांतता कायम ठेऊन सहकार्य करण्याचे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.

Advertisement

त्यांनी म्हटले आहे की, मराठा आरक्षण हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. यामध्ये कोणीही भडक वक्तव्ये करून समाजामध्ये विद्वेष निर्माण करू नये. यासंदर्भात पोलीस यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. सध्या राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर असून, पोलीस त्यामध्ये व्यस्त आहेत. त्यांचा ताण वाढेल, असे कृत्य करणे योग्य ठरणार नाही. आरक्षणाच्या संदर्भात भावना कितीही तीव्र असल्या तरी रस्त्यावर उतरून अशांतता निर्माण करू नये. हा विषय चर्चा करून कायदेशीर मार्गाने सोडवता येईल.

Advertisement

तसेच यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे की, मराठा आरक्षणाचा अजून लढा संपलेला नाही. राज्य सरकार यापुढेही प्रयत्न सुरूच ठेवणार आहे. परंतु, काही मंडळी उद्रेकाची भाषा करीत आहेत. हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. त्यामुळे आंदोलनाची भूमिका आश्चर्यकारक असून, हे केवळ राजकारणासाठी सुरू आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply