Take a fresh look at your lifestyle.

‘रोज गोमूत्र पिल्यास कोरोना होत नाही..’, ‘या’ भाजप आमदाराने केलाय दावा..!

नवी दिल्ली : देशभर कोरोनाच थैमान सुरु असताना, अनेक ठिकाणी औषधांचा तुटवडा जाणवत आहे. दवाखान्यात उपचार मिळत नसल्याने काहींनी गावठी, देशी उपाय सुरु केले आहेत. अंधश्रद्धेतून कोणी नदीतील घाण पितेय, कोणी गंडादोरा करतंय, तर कोणी काही..! अशात उत्तर प्रदेशमधील भाजपच्या एका आमदाराने कोरोनावर रामबाण उपाय सुचवला आहे. त्यामुळे कोरोना होतो की नाही, हे माहित नाही, मात्र सोशल मीडियात हे आमदार चांगलेच चर्चेत आले आहेत..

Advertisement

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) बलियाच्या बैरिया विधानसभेचे भाजप आमदार सुरेंद्र सिंह असे या आमदारांचे नाव आहे. अनेकदा आपल्या भलत्याच विधानांमुळे आणि कामांमुळे ते कायम चर्चेत असतात. अशात शुक्रवारी (ता.7) त्यांनी आपला आणखी एक व्हिडिओ शेअर केला. त्या माध्यमातून ते लोकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी गो-मूत्र पिण्याचा सल्ला देत आहेत.

Advertisement

आमदार सुरेंद्र सिंह म्हणतात, की मी रोज गोमूत्र पितो, त्यामुळेच मी निरोगी आहे. सकाळी ब्रश केल्यानंतर काहीही न खाता, थंड पाण्यात 5 झाकण गोमूत्र मिसळून प्यावं. नंतर अर्धा तास काहीच खाऊ नये. असं केल्यास कोरोनाच नाही, तर कोणताच आजार तुमचं काहीही बिघडवू शकणार नाही.

Advertisement

इतकंच नाही, तर कोणत्याही वैद्यकीय उपचारांपेक्षाही हा पर्याय उत्तम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सुरेंद्र सिंह यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना महामारीच्या काळात विज्ञानही फेल ठरलं आहे. अशात या गोमूत्रानं त्यांना अजूनही सुरक्षित ठेवलं आहे. दिवसभर बाहेर फिरुन आणि सतत लोकांमध्येही राहूनही आपल्याला काहीच न झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Advertisement

https://platform.twitter.com/widgets.js
ते म्हणाले, की जगालादेखील ही गोष्ट समजायला हवी, की गोमूत्राचं सेवन करुन कोरोना आटोक्यात आणणं शक्य आहे. इतकंच नाही, तर त्यांनी असंही म्हटलं, की कोरोनात अनेक जणांचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू होत आहे. गो-मूत्राचं सेवन करुन यातून बचाव करता येऊ शकतो.

Advertisement

खोकला आणि तापापासून वाचण्यासाठी त्यांनी गायीच्या तुपात हळदी पावडर मिसळून ठेवली आहे. जेव्हा जेव्हा ते बाहेर दौऱ्यावर जातात, तेव्हा सगळीकडेच फिल्टरचं पाणी मिळत नाही. अशात कुठेही पाणी पिल्यानंतर हे मिश्रण तोंडात टाकल्यास, तुम्ही सुरक्षित राहाल, असा सल्लाही सुरेंद्र सिंह यांनी दिला आहे.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement

v  कृषीरंग मार्केट अपडेटशेती-मातीच्या बातम्या, लेखमाहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

 | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply