Take a fresh look at your lifestyle.

आपल्या DRDO ची कमाल, करोना विषाणू होणार बेहाल; बनवले प्रभावी औषध, पहा कसे आणि किती आहे गुणकारी..!

मुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये एक दिलासा देणारी बातमी आली आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) शनिवारी कोरोनावर गुणकारी अशा 2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-डीजी) औषधाला मान्यता दिली आहे. कोरोना संक्रमित रूग्णांसाठी हा एक प्रभावी पर्यायी उपचार असेल. ज्या रूग्णांवर हे औषध वापरले गेले त्यांचा आरटी-पीसीआर अहवाल नकारात्मक आलेला आहे.

Advertisement

हे औषध संक्रमणाची वाढ थांबवून कोरोना रूग्णांना लवकर रिकव्हर करण्यास मदत करते. डॉ. रेड्डीज लैबोरेटरी यांच्या प्रयोगशाळेच्या मदतीने संरक्षण-संशोधन आणि विकास संघटना (DRDO / डीआरडीओ) यांच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर मेडिसिनने 2-डीजी हे औषध तयार केले आहे. सुरुवातीच्या चाचणीत असे आढळले आहे की यामुळे रुग्णाच्या ऑक्सिजनची पातळीही चांगली सुधारते.

Advertisement

या औषधाची 2020 डिसेंबर ते मार्च 2021 या कालावधीत 220 कोरोना रुग्णांवर तिसर्‍या टप्प्याची चाचणी घेण्यात आली. दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडूमधील 27 रुग्णालयांमध्ये ही चाचणी घेण्यात आली. तिसर्‍या दिवशीच चाचणी दरम्यान रुग्णांचे ऑक्सिजन अवलंबित्व यामुळे 42% वरुन 31% पर्यंत कमी झाले आहे. विशेष गोष्ट अशी आहे की, 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या रूग्णांनीदेखील औषधांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

Advertisement

हे औषध पावडर स्वरूपात उपलब्ध आहे. पाण्यात विरघळवून रुग्णाला द्यावे लागते. हे औषध थेट पेशींमध्ये पोहोचते आणि जिथे संक्रमण झालेले होते तिथे विषाणूची वाढ थांबवते. लॅब टेस्टिंगमधून असे दिसून आले की, कोरोना विषाणूविरूद्ध हे बर्‍यापैकी प्रभावी आहे. डीआरडीओने एक निवेदन जारी केले आहे की ते सहजपणे मोठ्या प्रमाणात तयार केले जाऊ शकते. त्यामुळे आता लवकरच भारतीय लष्करी संस्थेचे औषध करोना रुग्णांना जीवनदान देण्यासाठी तयार असेल.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply