Take a fresh look at your lifestyle.

लसचा काळाबाजार रोखण्यासाठी अखेर झालाय ‘हा’ महत्वाचा बदल; पहा नेमकी काय राहणार प्रोसिजर

अहमदनगर : अनेकदा करोना लसची नोंदणी करूनही लसीकरण केंद्रावर लस मिळत नाही. तरीही घरी आल्यावर अनेकांना लस घेतल्याचे मेसेज येतात. काहीजण सजग आणि शिकलेले असल्याने त्यांच्या हे लक्षात येते. मात्र, शिक्षित नसलेल्या अनेकांच्या हेच लक्षात येत नाही. मग त्यांच्या नावावरची लस खासगीत इतरांनाही दिली जात असल्याची प्रकरणे घडली आहेत. तसेच अनेकदा लसीकरण केंद्रावर व्हीआयपी संस्कृती जोपासली जात आहे.

Advertisement

Krushirang on Twitter: “यासह बियाणे, खते, शेती अवजारे आणि अन्नधान्य क्षेत्राशी निगडीत कंपन्यांना मोठा फायदा होईल. #मराठी #बातम्या #महाराष्ट्र #भारत #LatestNews #Maharashtra #MarathiNews #News #India #trending #health #covid19 #corona #CoronavirusIndia #Corona2ndWave #business https://t.co/xHn3DXHn6a” / Twitter

Advertisement

हेच सगळे रोखण्यासह यातील अडचणी लक्षात घेऊन आता कोविन या नोंदणी पोर्टल आणि अॅप्लिकेशनच्या लस देण्याच्या प्रोसिजरमध्ये काही बदल केलेले आहेत. मात्र, एकूणच हा प्रकार बैल गेला अन झोपा केला अशा पद्धतीत बसत आहे. कारण, या तांत्रिक चुकीचा गैरफायदा घेऊन वयात आणि नियम-अटीत न बसलेल्यांना लस मिळालेली आहे. शिवसेनेचे नगरमधील नेते योगीराज गाडे यांनीही याकडे लक्ष वेधले होते. एकूणच आतातरी किमान व्हीआयपी संस्कृतीला आळा बसेल असेच अनेकांना वाटत आहे.

Advertisement

Krushirang on Twitter: “करोना रुग्णांच्या जीवाशी खेळताना थेट ऑक्सिजन सिलेंडर घोटाळा झाल्याचे उघडकीस आलेले आहे. #मराठी #बातम्या #महाराष्ट्र #भारत #LatestNews #Maharashtra #MarathiNews #News #India #trending #health #CoronavirusIndia #Corona2ndWave #COVIDEmergency2021 https://t.co/j6QQTZenPr” / Twitter

Advertisement

नव्या पद्धतीत आपण नोंदणी केल्यावर म्हणजे आपल्याला लसीकरण कालावधीचा स्लॉट भेटल्यावर एक चार अंकी ओटीपी येईल. लसीकरण केंद्रावर तो नंबर सांगून आपल्याला लस मिळेल. यामुळे तांत्रिक चुका कमी होतील अशी शक्यता आहे. मात्र, अनेकजण नियमांना बाजूला ठेऊन काळाबाजार करण्यात महारथ ठेऊन असतात. अशा सर्वांना यामुळे मोठा कितपत झटका बसणार यावर याचे खऱ्या अर्थाने यश ठरणार आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply